शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

८० लाखांचा ‘ठग’ अद्याप बेपत्ता

By admin | Updated: November 14, 2015 01:58 IST

विदेशात नोकरी लावणे व पारपत्र (व्हिसा) बनविण्याच्या नावाखाली सुमारे १५० पेक्षा जास्त बेरोजगार युवकांना ठगविणारा ठग घटनेच्या पंधरवड्यानंतरही अद्याप बेपत्ता आहे.

पोलिसांची मुंबईवारी : रिकाम्या हाताने पथक परतलेवडेगाव : विदेशात नोकरी लावणे व पारपत्र (व्हिसा) बनविण्याच्या नावाखाली सुमारे १५० पेक्षा जास्त बेरोजगार युवकांना ठगविणारा ठग घटनेच्या पंधरवड्यानंतरही अद्याप बेपत्ता आहे. दरम्यान तपासासाठी मुंबईला गेलेले पोलीस पथक निव्वळ २२ पासपोर्टसह रिकाम्या हाताने परतले.प्राप्त माहितीनुसार, वडेगाव व परिसरातील सुमारे १५० हून अधिक बेरोजगार युवकांना दुबई व कुवैत या देशात नोकरी लावणे व त्यांचे पारपत्र बनवून देण्याच्या नावाखाली गंडविल्याची घटना २९ आॅक्टोबर रोजी उघडकीस आली. त्यानंतर घटनेतील आरोपी अद्याप बेपत्ता आहेत. या ‘विदेशी ठगीं’मध्ये आरोपी राजकुमार सुकुल साहानी (३४) रा. भटनी, जि. देवरिया (उ.प्र.) याने प्रत्येकाकडून ४० ते ५० हजार रुपये उकळले होते. सुमारे ८० लाख रुपयांची रोकड जमवून तो फरार आहे. सदर घटनेतील दुसरा आरोपी अरुणसिंह विरेंद्रसिंह यास अटक करण्यात आली असून त्यास भंडारा येथील कारागृह ठेवण्यात आले आहे. परंतु त्याच्याकडून अद्याप कुठलीही विशेष माहिती मिळाली नसल्यामुळे प्रकरणाची प्रगती थांबलेली आहे. दरम्यान अटक झालेल्या आरोपीकडून व ठगविल्या गेलेल्या युवकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथक दि. ५ आॅक्टोबरला तपासासाठी मुंबई रवाना झाले होते. सदर पथकाने आरोपीच्या ठाणे येथील ई-ट्रस्ट या कार्यालयात चौकशी केली.