शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वाणवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

२५ दिवसात वाढले ७६९ कोरोना रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 05:00 IST

ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीपासूनच जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र आहे. १ ते २५ ऑगस्ट दरम्यान जिल्ह्यात आढळलेला कोरोना बाधितांची सरासरी काढल्यास दररोज ५२ कोरोना बाधितांची भर पडल्याचे दिसून येते. तर पाच महिन्याच्या कालावधीत सहा कोरोना बाधितांचा मृत्यू झाला तर २५ ऑगस्टपर्यंत ८ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देऑगस्ट महिन्यात रुग्ण वाढीचा वेग तिप्पट : पाच महिन्यात २८८ रुग्णांची नोंद : जिल्ह्यात वाढतोय कोरोनाचा संसर्ग

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात २७ मार्चला पहिला कोरोना बाधित रुग्ण आढळला होता. त्यानंतर तब्बल दीड महिना कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली नव्हती. मार्च ते जुलै या पाच महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यात २८८ कोरोना बाधित आढळले. मात्र ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून २५ दिवसांच्या कालावधीत तब्बल ७६९ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहे. त्यामुळे आॅगस्ट महिन्यात कोरोनाचा स्फोट झाला असून आठ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीपासूनच जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र आहे. १ ते २५ ऑगस्ट दरम्यान जिल्ह्यात आढळलेला कोरोना बाधितांची सरासरी काढल्यास दररोज ५२ कोरोना बाधितांची भर पडल्याचे दिसून येते. तर पाच महिन्याच्या कालावधीत सहा कोरोना बाधितांचा मृत्यू झाला तर २५ ऑगस्टपर्यंत ८ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.कोरोना बाधितांसह कोरोनाने मृत्यू होण्याच्या संख्येत सुध्दा वाढ होत आहे. कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने जिल्हावासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.विशेष म्हणजे गोंदिया आणि तिरोडा तालुक्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे हे दोन्ही तालुके कोरोनाचे हॉटस्पॉट होत असल्याचे चित्र आहे.ऑगस्ट महिन्यातील कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता शहरी भागासह ग्रामीण भागात सुध्दा कोरोनाचा वेगाने शिरकाव होत असल्याचे चित्र आहे. कोरोनाला प्रतिबंध लावण्यात जिल्हा आणि आरोग्य प्रशासन सुध्दा अपयशी ठरले आहे. कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असताना दुसरीकडे आरोग्य यंत्रणेचा अनागोंदी कारभार पुढे येत आहे.कोविड केअर आणि क्वारंटाईन सेंटरमधील असुविधा आणि गैरसोयीमुळे या रुग्ण या ठिकाणी राहण्यास तयार नाही. तर अनेकजण बाहेरुन परतल्यानंतर याची माहिती प्रशासनाला देण्याचे टाळत आहेत. यामुळेच कोरोनाचा संसर्ग वाढत आहे.शासकीय कार्यालयांमध्ये कोरोनाचा शिरकावकोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असताना शासकीय कार्यालये सुध्दा यापासून दूर राहिले नाहीत. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषद कार्यालय, पोलीस स्टेशनमध्ये कोरोनाने शिरकाव झाला आहे. या शासकीय कार्यालयांमधील १५ ते २० अधिकारी कर्मचारी आतापर्यंत कोरोना बाधित आढळले आहे. तर अद्यापही बऱ्याच शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे अपडाऊन सुरूच आहे. यामुळे सुध्दा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे चित्र आहे.ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक मृत्यूजिल्ह्यात कोरोनाने आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. यात मागील पाच महिन्यात कोरोनाने सहा जणांचा मृत्यू झाला. तर आॅगस्ट महिन्यात कोरोनाने ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १०६९ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. आॅगस्ट महिना जिल्हावासीयांसाठी चिंताजनक ठरला.आरोग्य विभागात रिक्त पदांची समस्यामागील पाच महिन्यांपासून सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील भार निश्चितच वाढला आहे. जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रामध्ये डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाºयांची बरीच पदे रिक्त आहेत. जिल्ह्यातील १२०० लोकांमागे सध्या १ आरोग्य कर्मचारी कार्यरत आहे. पण आरोग्य विभागातील रिक्त पदे अद्यापही भरण्यात आली नाही. त्यामुळे समस्येत अधिक वाढ होत आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या