‘त्या’ अपहारातील ७६ लाख २१ हजार जप्त

By Admin | Updated: June 16, 2014 23:34 IST2014-06-16T23:34:19+5:302014-06-16T23:34:19+5:30

देवरी तहसील कार्यालयातील नाझर व अव्वल कारकून यांना अटक करून त्यांच्याकडून ७६ लाख २१ हजार ६०० रूपये आतापर्यंत जप्त करण्यात आले आहेत.

76 lakh 21 thousand of those 'abductions' were seized | ‘त्या’ अपहारातील ७६ लाख २१ हजार जप्त

‘त्या’ अपहारातील ७६ लाख २१ हजार जप्त

गोंदिया : देवरी तहसील कार्यालयातील नाझर व अव्वल कारकून यांना अटक करून त्यांच्याकडून ७६ लाख २१ हजार ६०० रूपये आतापर्यंत जप्त करण्यात आले आहेत.
देवरी तहसील कार्यालयातील नामदेव शंकर बुटे व अव्वल कारकून सुनिल खुशाल वैरागडे या दोघांना अटक करण्यात आली. देवरी पोलिसांनी या दोघांची चौकशी केल्यावर अव्वल कारकून सुनिल वैरागडे याच्या घरी धाड घालून ७१ लाख ५० हजार रूपये मंगळवारच्या रात्री ९.४५ वाजता जप्त केले. त्यानंतर बुधवारच्या सकाळी तहसिल कार्यालयातील सुनिल वैरागडे याच्या टेबलच्या ड्राव्हरमधून १४ हजार रूपये, व त्याच्या घरून ७ हजार ६०० रूपये जप्त करण्यात आले. नामदेव शंकर बुटे या नाझर कडून चार लाख ५० हजार रूपये ज्पत करण्यात आले. बुटे देवरी येथील पिंपळकर यांच्या घरी भाड्याने राहात होता. त्या घरमालकाला २ लाख रूपये देऊन ठेवले होते. तर अडीच लाख रूपये देवरी येथील भाड्याच्या खोली शेजारी राहणाऱ्या श्रीमती मेश्राम यांना देऊन ठेवले होते. ही रक्कम पोलिसांनी हस्तगत केली आहे.
या दोन्ही आरोपींच्या खात्यातून रक्कम काढली जाऊ नये यासाठी पोलिसांनी या दोन्ही आरोपींचे सर्वच खाते गोठविलेले आहेत. बुट्टे यांनी आपल्या परभणी व नांदेड येथील नातेवाईकांना पैसे देऊन ठेवले. त्यामुळे तेथील पैसे हस्तगत करण्यासाठी मागील तीन दिवसापासून देवरी येथील एक पथक रवाना झाला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार व त्यांच्या सोबत चार कर्मचारी मागील तीन दिवसापासून रवाना झाले आहेत. या प्रकरणात आतापर्यंत घोळ कितीचा झाला याची माहिती पोलिसांना मिळू शकली नाही. या रकमेचा आॅडीट झाल्यावरच नेमका कितीचा अपहार आहे याची माहिती समोर येणार आहे. या प्रकरणात बॅकेच्या अधिकाऱ्यांचा तर समावेश नाही ना अशी विचारणा केल्यावर पोलिसांनी सदर घटनेसंदर्भात तपास सुरू असल्याचे सांगितले. परंतु बँकेच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे किंवा नाही या पश्नावर पोलीस निरूत्तर राहीले. या आरोपींना न्यायालयाने १८ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या काळात आरोपींकडून अनेक बाबी पुढे येण्याची शक्यता आहे.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: 76 lakh 21 thousand of those 'abductions' were seized