शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
2
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
3
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
4
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
5
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
6
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
7
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
8
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
9
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
10
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
11
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
12
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
13
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
14
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
15
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
16
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
17
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
18
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
19
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
20
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

आठ ग्रा.पं.त ६६ टक्के मतदाननागऱ्यात गडबड : गोंदियाची टक्केवारी उशिरापर्यंत गुलदस्त्यात

By admin | Updated: April 23, 2015 00:31 IST

जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या निवडणुकीपूर्वीची रंगीत तालीम ठरलेल्या गोंदिया तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींच्या ..

गोंदिया : जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या निवडणुकीपूर्वीची रंगीत तालीम ठरलेल्या गोंदिया तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवारी ६६.६६ टक्के मतदान झाले. यासोबतच जिल्ह्यातील इतर आठ ग्रामपंचायतीत पोटनिवडणुका झाल्या. यादरम्यान कुठेही कोणती गडबड झाली नसली तरी त्या-त्या ग्रामपंचायत क्षेत्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.गोंदिया तालुक्यातील खमारी, फुलचूर, फुलचूरटोला, चुटिया, घिवारी, कटंगटोला, नागरा व हिवरा या आठ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ३० हजार मतदार पात्र होते. याशिवाय ढाकणी ग्रामपंचायतीच्या प्रभाग ३.मुंडीपार (ढा.) प्रभाग ३, किन्ही प्रभाग १, देवूटोला प्रभाग २, गोरेगाव तालुक्यातील कमरगाव प्रभाग क्र.३, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खामखुर्रा प्रभाग क्रमांक २, बाकटी प्रभाग क्र.२ आणि सडक अर्जुनी तालुक्यातील बाम्हणी (ख.) प्रभाग क्र.२ येथे ग्रामपंचायत प्रभागाच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान झाले. सकाळी साडेसात वाजतापासून मतदानाला सुरूवात झाली. सकाळी ११ वाजेपर्यंत मतदारांमध्ये मतदानासाठी चांगला उत्साह दिसून आला. सर्वांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रात स्थानिक सुटी जाहीर केली होती. अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत उतरण्यास इच्छुक असणाऱ्यांनी या निवडणुकीत अधिक सक्रिय होऊन आपल्या कार्यकर्त्यांना कामी लावल्याचे दिसून येत होते. अनेक ठिकाणी तर येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रंगीत तालीम म्हणूनच या निवडणुकीकडे पाहिले जात आहे. उद्याच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)नववधुने बजावला मतदानाचा हक्कफूलचर ग्रामपंचायत क्षेत्रात एका नवविवाहितेने सासरी जाण्यापूर्वी माहेरच्या नावावरील आपला मतदानाचा हक्क बजावून राष्ट्रीय कार्यात योगदान दिले. सीमा नागपुरे या तरुणीचा विवाह झाल्यामुळे यापुढे तिचे नाव सासरकडील नवीन मतदार यादीत जोडले जाणार आहे. त्यामुळे माहेरील नावाने असलेला मतदानाचा शेवटचा हक्क बजावण्याची संधी तिने सोडली नाही.आज मतमोजणीआठ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि आठ प्रभागांच्या पोटनिवडणुकीसाठी बुधवारी मतदान झाल्यानंतर गुरूवारी (दि.२३) सकाळी १० वाजतापासून मतमोजणीला सुरूवात होणार आहे. त्यात गोंदिया तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींची मतमोजणी गोंदिया तहसील कार्यालय (बॅडमिंटन हॉल), तर इतर पोटनिवडणुकींसाठी सडक अर्जुनी तहसील कार्यालय, गोरेगाव तहसील कार्यालय, अर्जुनी मोरगाव तहसील कार्यालय या ठिकाणी मतमोजणी करण्यात येणार आहे.नागऱ्यातील नागरिकांनी केली तक्रारनागरा ग्रामपंचायतीत बुधवारी मतदानादरम्यान काही कर्मचाऱ्यांच्या वागणुकीवर काही लोकांनी आक्षेप घेतला. अंगणवाडी सेविका नागरीकर, पोरवार वॉर्ड क्र.३ मध्ये घरोघरी जात असल्याचे पाहून काही लोकांनी आता कोणता सर्व्हे करीत आहात असे विचारले असता त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही. अंगणवाडी सेविका नागरीकर एका उमेदवाराच्या वहिणी आहेत. त्यामुळे त्या घरोघरी जाऊन मतदारांना फूस लावत होत्या, असा आरोप करीत या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी तहसीलदारांकडे केली.