शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

वैनगंगेच्या पात्रातून ६० लाखांची रेती चोरली

By admin | Updated: November 27, 2015 02:02 IST

राज्यात रेतीघाटाचे लिलाव झाले नसतानाही महालगाव, मुर्दाळा येथील वैनगंगा नदीच्या पात्रातून ३००० घनमीटर रेतीचा उपसा करण्यात आला....

महसूल विभागाचे सोटेलोटे : वन विभागाने पकडले तीन ट्रॅक्टरगोंदिया : राज्यात रेतीघाटाचे लिलाव झाले नसतानाही महालगाव, मुर्दाळा येथील वैनगंगा नदीच्या पात्रातून ३००० घनमीटर रेतीचा उपसा करण्यात आला. ९००० ब्रास रेती चोरी करून नेण्यात आली. या प्रकाराला तालुक्याच्या महसूल विभागाची मूक संमती असल्याने एवढी रेती चोरी गेल्यानंतरही कोणावरही कारवाई झाली नाही. महालगाव, मुर्दाळा परिसरातील ३० ते ४५ ट्रॅक्टरच्या माध्यमातून मागील महिनाभरापासून वैनगंगा नदीच्या पात्रातून रात्रंदिवस जेसीबीच्या माध्यमातून रेतीचा उपसा करून ३००० घनमीटरमधील रेती काढण्यात आली. या रेती चोरीमुळे शासनाचा ६० लाखांचा महसूल बुडाला आहे. मागील महिनाभरापासून या ठिकाणातून अवैध रेती चोरी होत असताना महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी एकाही वाहनावर कारवाई केली नाही. या घाटावरून रेती चोरणाऱ्यांनी महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आर्थिक देवाणघेवाणीत बांधून ठेवल्यामुळे ते कारवाईसाठी धजावत नसल्याचे बोलले जाते. सर्व नियम धाब्यावर ठेवून रात्रीच्यावेळी मोठ्या प्रमाणात रेतीची वाहतूक केली जात होती. या घाटाचा लिलाव करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रक्रिया करण्यात आली. मात्र या घाटावरून मोफत रेती वाहतूक केली जात असल्याने कुण्याही व्यक्तीने सदर घटा घेण्यासाठी पुढाकार दर्शविला नाही. दरवर्षी या घाटावरून मोठ्या प्रमाणात रेती चोरीला जात आहे. इतरही काही घाटांवरून अशाच प्रकारे रेतीची चोरी होत आहे. पण खनिकर्म विभाग त्याकडे मुद्दाम डोळेझाकपणा करीत आहे. रेती माफियांशी असलेले अधिकाऱ्यांचे साटेलोटे आणि त्यातून होणार मिळकत पाहता कारवाई करणार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. (तालुका प्रतिनिधी)वन विभागाची कारवाईया घाटातील रेती काढण्यासाठी ट्रॅक्टर चालकांनी वनविभागाची जमीन जेसीबीने खोदून लांब रस्ता तयार केला आहे. वनविभागाचीही याकडे दुर्लक्ष होते. मागील महिनाभरापासून त्यांच्या जागेतून अवैध रेतीची वाहतूक होतानाही महसूल विभाग किंवा वनविभागाने करवाई केली नव्हती. यासंदर्भात नागरिकांनी एक तक्रार उपवनसंरक्षक यांच्याकडे केली. त्यानंतर सहाय्यक उपवनसंरक्षक योगेश वाघाये व त्यांच्या चमूने शनिवारी कारवाई करून तीन ट्रॅक्टर पकडले. ते तीन ट्रॅक्टर वनविभाग गोंदियाच्या कार्यालयात जमा करण्यात आले आहे. ५०० ब्रास रेतीचा साठा जप्तया घाटावरून मोठ्या प्रमाणात रेती चोरी केली जात असल्याने मागील महिनाभरापूर्वी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी महालगाव मुर्दाळा येथील रेती चोरट्यांकडून ५०० ब्रास रेतीचा साठा जप्त करून त्या साठ्याचा पाच लाख रुपयात लिलावही केल्याचे तहसीलदार संजय पवार यांनी सांगितले. मागच्यावर्षी कारवाई झाली नाही.