शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

५४ उमेदवारांमध्ये होणार लढत

By admin | Updated: October 1, 2014 23:24 IST

विधानसभा निवडणुकीसाठी नामांकन दाखल करणाऱ्यांसाठी माघार घेण्याची आज शेवटची संधी होती. त्यामुळे दुपारी ३ पर्यंत ९२ उमेदवारांपैकी ३८ उमेदवारांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली.

सर्वाधिक चुरस गोंदियात : चारही मतदार संघात ३८ उमेदवारांची माघारगोंदिया : विधानसभा निवडणुकीसाठी नामांकन दाखल करणाऱ्यांसाठी माघार घेण्याची आज शेवटची संधी होती. त्यामुळे दुपारी ३ पर्यंत ९२ उमेदवारांपैकी ३८ उमेदवारांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली. आता ५४ उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. त्यापैकी सर्वाधिक १९ उमेदवार गोंदिया मतदार संघात, तिरोडा मतदार संघात १४, अर्जुनी मोरगाव मतदार संघात १३ तर आमगावमध्ये ८ उमेदवार रिंगणात आहेत. बुधवारी नामांकन मागे घेणाऱ्यांमध्ये अपक्षांचा भरणा होता. पक्षीय चिन्हावर लढणाऱ्या कोणत्याही उमेदवाराने माघार घेतलेली नाही. विशेष म्हणजे शिवाय पक्षाची तिकीट मिळण्याच्या आशेने निवडणूक लढण्याची पूर्ण तयारी केलेल्या काही बंडखोर उमेदवारांनीही नामांकन कायम ठेवले आहे. त्यात तिरोड्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर दिलीप बन्सोड, अर्जुनी मोरगावमधून काँग्रेसचे रत्नदीप दहीवले, अजय लांजेवार, देवरीतून भाजपाचे सहेसराम कोरोटे यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. मात्र अर्जुनी मोरगाव मतदार संघातून भाजपाचे पोमेश रामटेके, राष्ट्रवादी काँग्रेसचे मिलन राऊत, तिरोड्यातून काँग्रेसचे राधेलाल पटले यांनी मात्र माघार घेतली आहे. त्यामुळे बंडखोरांची ही उमेदवारी पक्षीय उमेदवारांना डोकेदुखी ठरणार आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे दिलीप बन्सोड यांनी पक्षाचा राजीनामा देत स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय कायम ठेवला आहे.जिल्ह्यातील चारही मतदार संघांमध्ये आता निवडणूक रिंगणात कायम असलेले उमेदवार पुढीलप्रमाणे आहेत.अर्जुनी मोरगावअर्जुनी मोरगाव मतदारसंघातून किरण यशवंत कांबळे (शिवसेना), राजेश मुलचंद नंदागवळी (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), राजकुमार सुदाम बडोले (भारतीय जनता पार्टी), मनोहर गोवर्धन चंद्रीकापुरे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), भिमराव कारूजी मेश्राम (बहुजन समाज पार्टी), धनपाल मिठू रामटेके (भारिप बहुजन महासंघ), अजय संभाजी लांजेवार (अपक्ष), प्रमोद हिरामन गजभिये (अपक्ष), जगन ऊर्फ जयेश बारसू गडपाल (अपक्ष), रत्नदिप सुखदेवकुमार दहिवले (अपक्ष), दिलवर कुंजीलाल रामटेके (अपक्ष), इंजि. दिलीपकुमार ललदास वालदे (अपक्ष), महेश ताराचंद शेंडे (अपक्ष) हे उमेदवार निवडणूक लढतीत कायम आहेत.गोंदियागोंदिया मतदार संघात गोपालदास शंकरलाल अग्रवाल (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), विनोद संतोषकुमार अग्रवाल (भाजप), राजकुमार संतपराव कुथे (शिवसेना), करुणाताई मिलिंद गणवीर (कॉम्युनिस्ट पार्टी आॅफ इंडिया), अशोक लक्ष्मीनारायण गुप्ता (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), योगेश माधवराव बन्सोड (बसपा), गोपाल तुकाराम उईके (गोंडवाना गणतंत्र पार्टी), विनोदकुमार मनोहर नंदूरकर (आंबेडकराईट पार्टी आॅफ इंडिया), चिंधूजी लखाजी उके (अपक्ष), संतोष कामताप्रसाद उमरे (अपक्ष), सुरेशकुमार खिंदूलाल चौरागडे (अपक्ष), छैलबिहारी मातादीन अग्रवाल (अपक्ष), धमेंद्र सुखदेव गजभिये (अपक्ष), नामदेव मोतीराम बोरकर (अपक्ष), नारायण पुरनलाल पटले (अपक्ष), दिगंबर सुनऊ पाचे (अपक्ष), लक्ष्मण पांडुरंग मेश्राम (अपक्ष), मंगल बाबुलाल मस्करे (अपक्ष), राजू रुपचंद ठकरेले (अपक्ष) हे उमेदवार रिंगणात आहेत. तिरोडातिरोडा मतदारसंघातून परसराम ग्यानीराम कटरे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), राजलक्ष्मी राजेशकुमार तुरकर (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), पंचम तानुजी बिसेन (शिवसेना), विजय भरतलाल रहांगडाले (भारतीय जनता पार्टी), दीपक हिरालाल हिरापुरे (बसपा), कादीर शेख खलीफ शेख (मायनॉरिटीज डेमोक्रेटीक पार्टी), विरेंद्र कस्तुरचंद जायस्वाल (पिझन्ट्स अ‍ॅन्ड वर्कर्स पार्टी आॅफ इंडिया), अविनाश रामदास नेवारे, प्रताप तिलकचंद पटले, दिलीप वामन बन्सोड, राजकुमार ईश्वरलाल बोहणे, मनोहर फुलचंद पटले, श्रावण आसाराम रहांगडाले, सुरेश दादू टेंभरे या उमेदवारांनी माघार घेतली नाही.आमगावआमगाव मतदारसंघातून मुलचंद हरिचंद गावराणे (शिवसेना), रमेश नारायण ताराम (राष्ट्रवादी काँग्रेस), संजय हनवंतराव पुराम (भाजपा), रामरतनबापू भरतराजबापू राऊत (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), शारदा उदेराम उईके (बसपा), केशवकुमार लक्ष्मणराव भोयर (अपक्ष), सहसराम मारोती कोरोटे (अपक्ष), संतोष महितपराव नाहाके (अपक्ष) असे आठ उमेदवार रिंगणात आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)