शहरं
Join us  
Trending Stories
1
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
2
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
5
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
6
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
7
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
8
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
9
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
10
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
11
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
12
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
13
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
14
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
15
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
16
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
17
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
18
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
19
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
20
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

५ कोटी ३५ लाख रूपये शासनाला परत पाठविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 05:00 IST

प्रत्येक ग्रामपंचायतीला पायाभूत सुविधा करण्यासाठी म्हणून शासनाकडून १४ वित्त आयोगाचा निधी दिला जातो. हा निधी खर्च करताना मानव विकासाच्या कामांचे नियोजन केले जाते. केंद्रीय आयोगाच्या निर्देशानुसार हा पैसा खर्च केला जातो. आमच गाव आपला विकास पिण्याचे पाणी, स्वच्छता, ग्रामपंचायत भवन, अंगणवाडी बांधकाम, दिवाबत्ती व सौरदिव्यांची सोय, आवश्यक देखभाल दुरूस्तीची कामे करण्यासाठी हा निधी असतो.

ठळक मुद्देगोंदिया जि.प.चे पाऊल : कोरोनाच्या लढ्यात पैसे पडणार उपयोगी

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे जागतिक स्तरावर मोठ्या हालचाली झाल्या. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाला जागतिक महामारी असे संबोधले. या संकटाचा सामना करण्यासाठी शासनाला पैशाची नितांत गरज असल्यामुळे शासनाने नवीन कामावर बंदी आणली परंतु उर्वरीत खर्चालाही कात्री लावली. गाव विकासाची कामे करण्यासाठी दिलेल्या १४ वित्त आयोगाचा निधीवर मिळणाऱ्या व्याजाची रक्कम परत मागीतली आहे. गोंदिया जिल्ह्याला मिळालेल्या १४ वित्त आयोगाच्या निधीवर एकूण ५ कोटी ३५ लाख रूपयांचे व्याज मिळाले असून ते पैसे आता शासनाला परत पाठविले जाणार आहेत.प्रत्येक ग्रामपंचायतीला पायाभूत सुविधा करण्यासाठी म्हणून शासनाकडून १४ वित्त आयोगाचा निधी दिला जातो. हा निधी खर्च करताना मानव विकासाच्या कामांचे नियोजन केले जाते. केंद्रीय आयोगाच्या निर्देशानुसार हा पैसा खर्च केला जातो. आमच गाव आपला विकास पिण्याचे पाणी, स्वच्छता, ग्रामपंचायत भवन, अंगणवाडी बांधकाम, दिवाबत्ती व सौरदिव्यांची सोय, आवश्यक देखभाल दुरूस्तीची कामे करण्यासाठी हा निधी असतो.गोंदिया जिल्ह्यात असलेल्या या निधीचे व्याजही ग्रामपंचायतींना मिळतो. गोंदिया जिल्ह्याला दिलेल्या १४ वित्त आयोगाच्या निधीतील रकमेचे व्याज शासनाला परत पाठविण्यात येत आहे. त्यासाठी गोंदिया जिल्ह्यातून ५ कोटी ३५ लाख ४ हजार ६५० रु पये शासनाला परत पाठविले जाणार आहेत.यात ग्रामपंचायतींकडे असलेल्या पैशावर ३ कोटी ६९ लाख ९४ हजार ५७ रुपये तर जिल्हा परिषदेकडे असलेल्या पैशामुळे एक कोटी ६५ लाख १० हजार ५९३ रूपये असे एकूण ५ कोटी ३५ लाख ४ हजार ७५० रूपये व्याजाच्या रूपात मिळाले आहेत. ते शासनाला परत पाठविले जाणार आहेत.यात आमगाव तालुक्याकडे ४२ लाख ७ हजार ९३३ रूपये, अर्जुनी मोरगाव तालुक्याकडे ६८ लाख ११ हजार ३३४ रूपये, गोरेगाव तालुक्याकडे २७ लाख ३८ हजार एक रुपये, देवरी तालुक्याकडे ५७ लाख रु पये, तिरोडा तालुक्याकडे ५६ लाख ७९ हजार ६६३ रु पये, सालेकसा तालुक्याकडे २८ लाख ६८ हजार ६८८ रु पये, सडक-अर्जुनी तालुक्याकडे ५२ लाख ८८ हजार ४३८ रूपये तर गोंदिया तालुक्याकडे ३७ लाख रूपये असे एकूण ग्रामपंचायत स्तरावर असलेल्या १४ वित्त आयोगाच्या रक्कमेवर ३ कोटी ६९ लाख ९४ हजार ५७ रु पये व्याजाचे मिळालेले आहेत.गोंदिया जिल्हा परिषदेला दिलेल्या रकमेवर एक कोटी ६५ लाख १० हजार ५९३ रूपये व्याजाचे मिळालेले आहेत. मिळालेला हा निधी लवकरच शासनाला परत पाठविण्यात येणार आहे. १४ व्या केंद्रीय वित्त आयोग अंतर्गत दिलेल्या निधीचे नियोजन ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था करते.गोंदिया जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत व जिल्हा परिषदेकडे असलेल्या १४ वित्त आयोगाच्या रकमेवर मिळालेल्या व्याजाची रक्कम ५ कोटी ३५ लाख रूपये झाली आहे. ही रक्कम शासन जमा केली जाणार आहे.- नरेश भांडारकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) जि.प. गोंदिया. 

टॅग्स :zpजिल्हा परिषदGovernmentसरकार