लॉकडाऊनमध्ये ४६२ स्थलांतरित बालके दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 05:00 AM2020-06-05T05:00:00+5:302020-06-05T05:00:31+5:30

गोंदिया जिल्ह्यातील कायमचे रहिवासी असणाऱ्या परंतु व्यवसाय, शेती, शिक्षण व इतर कामानिमित्त इतर राज्य अथवा जिल्ह्यामध्ये गेलेले नागरिक कुटुंबासह स्वगावी परत येत आहेत. त्यांच्यासोबत लॉकडाऊनच्या काळात ६ ते १४ वयोगटातील बालके सुद्धा आहेत. ९ मे पासून बाहेरून आलेल्या स्थलांतरीत व्यक्तींची माहिती चेकपोस्टवर घेण्यात येत आहे.

462 migrant children admitted in lockdown | लॉकडाऊनमध्ये ४६२ स्थलांतरित बालके दाखल

लॉकडाऊनमध्ये ४६२ स्थलांतरित बालके दाखल

googlenewsNext
ठळक मुद्देआरटीई अंतर्गत अधिकार : गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : देशात आणि राज्यात कोरोना विषाणूच्या पार्श्वभुमीवर देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. मात्र यामुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी इतर राज्यातील किंवा जिल्ह्यातील नागरिक स्वगावी येत आहेत व जात आहेत. कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन कालावधीत जिल्ह्यात स्थलांतरीत होऊ आलेले ६ ते १४ वयोगटातील शाळाबाह्य बालकांना नियमित शाळेत दाखल करण्यात येणार आहे. मे महिन्यात ४६२ बालके ही स्थलांतर होऊन गोंदिया जिल्ह्यात दाखल झाली आहेत.
गोंदिया जिल्ह्यातील कायमचे रहिवासी असणाऱ्या परंतु व्यवसाय, शेती, शिक्षण व इतर कामानिमित्त इतर राज्य अथवा जिल्ह्यामध्ये गेलेले नागरिक कुटुंबासह स्वगावी परत येत आहेत. त्यांच्यासोबत लॉकडाऊनच्या काळात ६ ते १४ वयोगटातील बालके सुद्धा आहेत. ९ मे पासून बाहेरून आलेल्या स्थलांतरीत व्यक्तींची माहिती चेकपोस्टवर घेण्यात येत आहे. इतर जिल्ह्यातून किंवा राज्यातून गोंदियामध्ये आलेल्या कुटुंबाचीे माहिती चेकपोस्टवर कार्यरत असलेल्या शिक्षक-कर्मचारी यांनी माहिती घेतली आहे. ६ ते १४ वयोगटातील बालके ९ ते ३१ मे २०२० या कालावधीत पोहचली त्या बालकांना जिल्ह्यात दाखल झाल्यापासून १४ दिवस क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांचे १४ दिवस क्वारंटाईन झाल्यानंतर सदर बालकांना जवळच्या नियमित शाळेत दाखल करण्यात यावेत अश्या सूचना देण्यात आल्यात आल्या. ज्या बालकांना नियमीत शाळेत दाखल करण्यात आले नाही त्यांना दाखल करावे अश्या सूचना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहे. सदर बालकास जवळच्या नियमित शाळेत दाखल करून सदर बालकास कोणत्या शाळेत व कोणत्या वर्गात दाखल केले याची माहिती सादर करावी,अशा सूचना जिल्हा परिषदेने गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

स्थलांतरित होऊन आलेली ६ ते १४ वयोगटातील बालके शाळेत दाखल झाली नसल्यास सदर विद्यार्थ्यांना जवळच्या नियमित शाळेत दाखल करून घ्यावे. सदर विद्यार्थ्यांची यादी स्वतंत्र प्रपत्रामध्ये सादर करावी. विद्यार्थ्यांचा शोध घेताना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता स्वत:ची आरोग्य विषयक काळजी घेवून शिक्षक विद्यार्थ्यांना दाखल करावे.
- राजकुमार हिवारे, प्राथमिक शिक्षणाधिकारी गोंदिया.

Web Title: 462 migrant children admitted in lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.