शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

४० कोटी रुपयांचे चुकारे मिळणार दोन दिवसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 06:00 IST

आदिवासी विकास महामंडळाने जिल्ह्यातील ४४ शासकीय धान खरेदी केंद्रावरुन यंदा खरीप हंगामात २ लाख ६३ ९६६ क्विंटल धानाची खरेदी केली. खरेदी केलेल्या धानाची एकूण किमत ४७ कोटी ९० लाख रूपये आहे. यापैकी ३१ कोटी ५ लाख ८६ हजार रुपयांचे चुकारे अद्यापही करण्यात आले नाही. तर जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आत्तापर्यंत ७ लाख क्विंटल धानाची खरेदी केली असून याची किमत १२५ कोटी रुपये आहे.

ठळक मुद्देछगन भुजबळ यांनी दिले निर्देश : मनोहर चंद्रिकापुरे यांनी मांडला प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळ आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या शासकीय धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून हमीभावानुसार धान खरेदी केली जाते. मात्र यावर्षी या दोन्ही विभागाने खरेदीसाठी वेळेवर निधी उपलब्ध न करुन दिल्याने ४० कोटी रुपयांचे चुकारे थकल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली. आ. मनोहर चंद्रिकापुरे यांनी ही बाब ग्रामविकास मंत्री छगन भुजबळ यांच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर त्यांनी दोन दिवसात यासाठी निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले.आदिवासी विकास महामंडळाने जिल्ह्यातील ४४ शासकीय धान खरेदी केंद्रावरुन यंदा खरीप हंगामात २ लाख ६३ ९६६ क्विंटल धानाची खरेदी केली. खरेदी केलेल्या धानाची एकूण किमत ४७ कोटी ९० लाख रूपये आहे. यापैकी ३१ कोटी ५ लाख ८६ हजार रुपयांचे चुकारे अद्यापही करण्यात आले नाही. तर जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आत्तापर्यंत ७ लाख क्विंटल धानाची खरेदी केली असून याची किमत १२५ कोटी रुपये आहे. यापैकी फेडरेशनला ११६ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला असून ९ कोटी रुपयांचे चुकारे थकले आहे. आदिवासी विकास महामंडळाला शासनाकडून चुकारे करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यास विलंब होत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे.अनेक शेतकऱ्यांनी उधार उसनवारी आणि कर्ज फेडण्यासाठी अडचण जात आहे. हीच बाब ओळखून आ.मनोहर चंद्रिकापुरे यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान ग्रामविकास मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर ही समस्या मांडली. या दोन्ही विभागाना चुकारे करण्यासाठी निधी देण्याची मागणी केली. भुजबळ यांनी याची दखल घेत त्वरीत संबंधित विभागाच्या सचिवांना बोलावून दोन दिवसात निधी उपलब्ध करुन देण्याचे निर्देश दिले. यामुळे शेतकऱ्यांची समस्या मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना चुकारे मिळत नसल्याने त्यांची आर्थिक कोंडी झाली होती. येत्या दोन दिवसात निधी उपलब्ध करुन देण्यात येणार असून शेतकऱ्यांची समस्या दूर होईल. - मनोहर चंद्रिकापुरे, आमदार.

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळ