शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

बारावीचे ३५ तर दहावीचे २८ कॉपीबहाद्दर पकडले

By admin | Updated: March 23, 2017 00:56 IST

यंदा दहावी-बारावीच्या परीक्षेत जिल्ह्यात कॉपीमुक्त वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला तरी काही केंद्रांवर याला गालबोट लागले.

कॉपीमुक्तीला गालबोट : ग्रामीण भागातील अनेक केंद्रांवर सूट गोंदिया : यंदा दहावी-बारावीच्या परीक्षेत जिल्ह्यात कॉपीमुक्त वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला तरी काही केंद्रांवर याला गालबोट लागले. गोंदिया जिल्ह्यात कॉपी करताना बारावीच्या ३५ तर दहावीच्या २८ विद्यार्थ्यांना पकडण्यात आले. त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात आली. बारावीची परीक्षा २८ फेब्रुवारीपासून तर दहावीची परीक्षा ७ मार्चपासून सुरू झाली. बारावीची परीक्षा संपली असून दहावीचा केवळ एक पेपर शिल्लक आहे. यंदा एकाही केंद्रावर गैरप्रकार सुरू राहू नये यासाठी यंत्रणा सज्ज होती. भरारी पथकांनी कॉपीमुक्त अभियान राबविण्यासाठी प्रयत्न केले. पण त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. परीक्षा अधिनियमानुसार परीक्षेतील गैरप्रकारावर आळा घालण्यासाठी केंद्र संचालक व अतिरीक्त केंद संचालक यांना सूचना देऊन एका केंद्रावर सात व वर्गखोलीत तीन वेळा कॉपी (आक्षेपार्ह) साहित्य आढळल्यास मास कॉपी सुरू असल्याचे गृहीत धरून कारवाई केली जाणार होती. परीक्षार्थ्यांनी वह्या, पिशवी किंवा मोबाईल आणू नये असे आवाहन करण्यात आले होते. ज्या वर्गात कॉपी चालत असेल त्यासाठी त्या वर्गातील पर्यवेक्षकाला जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान राबविण्याचा संकल्प शिक्षण विभागाने घेतला होता. बारावीच्या २३ हजार २१३ विद्यार्थ्यानी ६९ केंद्रांवरून परीक्षा दिली. दहावीचे २३ हजार ३६ विद्यार्थी ९८ केंद्रांवरून परीक्षा देत आहेत. या परीक्षेत कॉपी करताना बारावीचे ३५ तर दहावीचे १९ विद्यार्थी पकडण्यात आले. गोंदिया शहरातून बारावीचे २ तर दहावीचे ९ विद्यार्थी कॉपी करताना आढळले. गोंदिया ग्रामीण परिसरात बारावीचे १० कॉपी बहाद्दर पकडले. तिरोडा तालुक्यात बारावीचे १९ जण पकडले. आमगाव तालुक्यात दहावीचे ७ कॉपीबहाद्दर, सालेकसा तालुक्यात बारावीचे २ तर दहावीचा एक विद्यार्थी पकडला. देवरी तालुक्यात दहावीचा एक, सडक-अर्जुनी तालुक्यात बारावीचा १ आणि दहावीचे ७ कॉपीबहाद्दर पकडले. अर्जुनी-मोरगाव तालुक्यात बारावीचे १ तर दहावीचे ३ कॉपीबहाद्दर पकडले. (तालुका प्रतिनिधी) उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या पथकाने ११ जणांना पकडले दहावी व बारावीचे मिळून ६३ कॉपी बहाद्दरांना जिल्ह्यातील पथकाने पकडले आहे. मात्र यापैकी सर्वाधिक कॉपीबहाद्दर उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) लोकेश मोहबंशी, विस्तार अधिकारी महेंद्र मोटघरे यांच्या पथकाने पकडले. यात कामठा केंद्रावरून दोन, जि.प.हायस्कूल सडक अर्जुनी येथे एक, जि.प.हायस्कूल नवेगावबांध एक व आमगाव तालुक्याच्या जगत हायस्कूल घाटटेमणी या केंद्रावरून सात कॉपीबहाद्दरांना दहावीच्या इतिहासच्या पेपरला बुधवारी पकडण्यात आले. सात भरारी पथके दहावी व बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार टाळण्यासाठी सात भरारी पथकांची निर्मिती करण्यात आली होती. त्यात प्राथमिक शिक्षणाधिकारी यांचे पथक, माध्यमिक शिक्षणाधिकारी यांचे पथक, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक, डायट प्राचार्य, महिला पथक, बोर्डाचे पथक व जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार एक पथक असे सात पथक तयार करण्यात आले होते. गोरेगाव तालुका निरंक दहावी व बारावीच्या परीक्षेत कॉपी करताना प्रत्येक तालुक्यातून विद्यार्थ्यांना पकडण्यात आले. यात फक्त गारेगाव तालुका सुटला आहे. गोरेगाव तालुका खरच कॉपीमुक्त झाला की हेतूपुरस्सर या तालुक्याकडे भरारी पथकांनी दुर्लक्ष केले हे सांगता येत नाही. यंदा दहावी असो कि बारावी या दोन्ही वर्षातील गोरेगाव तालुक्यातील एकाही विद्यार्थ्याला कॉपी करताना पथक पकडू शकले नाही.