शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
2
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
3
Latest Marathi News LIVE: नसरापूर प्रकरण: विशेष सरकारी वकील म्हणून तीन नावांची शिफारस
4
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
5
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
6
Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
7
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
8
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
9
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
10
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
11
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
12
गेल्या ५० वर्षांत प. बंगालमध्ये झाले फक्त तीन मुख्यमंत्री; एकाची कारकीर्द २३ वर्षांहून जास्त! जाणून घ्या...
13
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
14
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
15
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
16
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
17
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
18
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
19
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
20
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
Daily Top 2Weekly Top 5

३२ लाचखोर एसीबीच्या जाळ्यात

By admin | Updated: January 1, 2015 23:03 IST

अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो (एसीबी) गोंदियाच्या सापळा कारवाईत मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल पाच पटींनी वाढ झाली आहे. सन २०१४ मध्ये एकूण २७ सापळा कार्यवाही करून ३२ लाचखोरांवर

वेलडन एसीबी : लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांचाही समावेशगोंदिया : अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो (एसीबी) गोंदियाच्या सापळा कारवाईत मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल पाच पटींनी वाढ झाली आहे. सन २०१४ मध्ये एकूण २७ सापळा कार्यवाही करून ३२ लाचखोरांवर सापळे रचून कारवाई करण्यात आली आहे. यात लोकप्रतिनिधींसह अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.एसीबीच्या कारवाईत ग्रामविकास विभागाच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतमधील पाच कर्मचाऱ्यांवर कारवाई करून सर्वाधिक गुन्हे दाखल करण्यात आले. त्या पाठोपाठ महसूल विभागात चार सापळा कारवाईत पाच आरोपी व पोलीस विभागात चार सापळा कारवाईत चार कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. विद्युत विभागात तीन सापळा कारवाईत तीन कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. भूमी अभिलेख व वन विभागात प्रत्येकी दोन सापळा कारवाईत तीन कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच परिवहन, आरोग्य, पशुसंवर्धन, सहकार व शिक्षण विभागात प्रत्येकी एका सापळा कारवाईत सात कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. याशिवाय एक सरपंच व एक कोतवाल यांच्याविरूद्ध लाचेचा यशस्वी सापळा रचून कारवाई करण्यात आली आहे. सन २०१४ मध्ये लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या सापळा कारवाईत वर्ग-१ चे तीन अधिकारी, वर्ग-२ चे पाच अधिकारी, वर्ग-३ चे १८ कर्मचारी, वर्ग-४ चे दोन कर्मचारी व इतर चार लोकसेवकांविरूद्ध लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.भ्रष्टाचाराची तक्रार करालाचेच्या यशस्वी सापळा कारवाईनंतर तक्रारदाराचे संबंधित कार्यालयात प्रलंबित असलेले कायदेशीर काम पूर्ण करून देण्यासाठी एसीबीतर्फे पाठपुरावा केला जातो व तक्रारदाराचे काम पूर्ण करून दिले जाते. सापळा कारवाईकरिता तक्रारदाराकडून पुरविण्यात येणारी रक्कम सापळा कारवाईनंतर तक्रारदारास शासनातर्फे परत केली जाते. नागरिकांनी मोठ्या संख्येने भ्रष्टाचाराविरूद्ध तक्रार देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन एसीबी गोंदियातर्फे करण्यात आले आहे.(प्रतिनिधी)