शहरं
Join us  
Trending Stories
1
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
2
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
3
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
4
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
5
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
6
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
7
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
8
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
9
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
10
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
11
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
12
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
13
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
14
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
15
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
16
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
17
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
18
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
19
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
20
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
Daily Top 2Weekly Top 5

प्लाझ्मा डोनेशनसाठी ३१ जणांची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 05:00 IST

मागील काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे जिल्हावासीयांच्या चिंतेत सुध्दा भर पडत आहे. कोरोनावर अद्याप लस उपलब्ध झाली नसली तरी प्लाझ्मा थेरपी बऱ्याच प्रमाणात उपयोगी पडत आहे. परिणामी याचा अनेक ठिकाणी प्लाझ्मा डोनरच्या मदतीने उपयोग केला जात आहे. यामुळे कोरोना बाधित रुग्ण बरे होण्यास त्याची मदत होत आहे.

ठळक मुद्देतीन कोरोना बाधितांची भर : पाच कोरोना बाधित झाले कोरोनामुक्त, जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या २३१ वर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्लाझ्मा थेरपी उपयोगी ठरत आहे. यामुळेच कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना प्लाझ्मा डोनेशनसाठी पुढे येण्याची साद शासन आणि आरोग्य विभागाने घातली आहे. यालाच प्रतिसाद देत कोरोनामुक्त झालेल्या ३१ जणांनी प्लाझ्मा डोनेशनसाठी तयारी दर्शविली आहे. त्यामुळे ही निश्चितच जिल्हावासीयांसाठी गौरवाची बाब आहे.मागील काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे जिल्हावासीयांच्या चिंतेत सुध्दा भर पडत आहे.कोरोनावर अद्याप लस उपलब्ध झाली नसली तरी प्लाझ्मा थेरपी बऱ्याच प्रमाणात उपयोगी पडत आहे. परिणामी याचा अनेक ठिकाणी प्लाझ्मा डोनरच्या मदतीने उपयोग केला जात आहे. यामुळे कोरोना बाधित रुग्ण बरे होण्यास त्याची मदत होत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २३१ कोरोना बाधित रुग्ण आढळले. यापैकी १९८ कोरोना बाधित कोरोनामुक्त होवून आपल्या घरी परतले आहे. यापैकीच बऱ्या झालेल्या ३१ जणांनी प्लाझ्मा डोनेशची तयारी आरोग्य विभागाकडे दर्शविली आहे. ही निश्चित दिलासादायक बाब आहे.जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. रविवारी (दि.१९) पुन्हा तीन कोरोना बाधितांची भर पडली. यात तिरोडा तालुक्यातील १ आणि गोंदिया तालुक्यातील २ जणांचा समावेश आहे. हे तिन्ही जण बाहेरुन आलेले आहे. त्यांना गोंदिया येथे क्वारंटाईन करुन ठेवण्यात आले होते. रविवारी त्यांचे स्वॅब नमुने कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्यांना येथील जिल्हा क्रीडा संकुलातील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले.तर पाच कोरोना बाधित कोरोनामुक्त झाल्याने जिल्हावासीयांना थोडा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २३१ कोरोना बाधितांची नोंद झाली असून यापैकी १९८ कोरोना बाधित कोरोनामुक्त होवून आपल्या घरी परतले आहे. सध्या स्थितीत जिल्ह्यात २८ कोरोना अ‍ॅक्टीव्ह रुग्ण आहेत.६८०३ स्वॅब नमुने कोरोना निगेटिव्हकोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत एकूण ७१४३ जणांचे स्वॅब नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. यापैकी २३१ नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. तर ६८०३ स्वॅब नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. २५ स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.८७ स्वॅब नमुन्यांच्या अहवालाबाबत अनिश्चितता आहे. रॅपिड अँटीजेन टेस्टच्या माध्यमातून आतापर्यंत ६८३ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. यापैकी ६८० नमुने निगेटिव्ह तर तीन नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या