शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

५१ योजनांवर २६.५३ कोटी खर्च

By admin | Updated: May 18, 2016 02:00 IST

ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी राज्यात मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल

गोंदिया : ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी राज्यात मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमाची घोषणा ७ मे रोजी राज्य शासनाने केली आहे. यांतर्गत राज्यातील बहुतांश जिल्हयात स्वतंत्र योजना कार्यान्वीत केल्या जात आहे. याकरिता चार वर्षांसाठी हा कार्यक्रम बनविण्यात आला आहे. यांतर्गत जिल्ह्यातील आमगाव तालुक्यात दहेगाव येथे ५९.०३ लाख रूपये, देवरी तालुक्यातील भर्रेगाव येथे ४७.०२ लाख, पिंकडेपार येथे ३३.१६ लाख, सावली येथे ३२.४२ लाख, सिरपूरबांध येथे ३०.१५ लाख, गोंदिया तालुक्यातील चंगेरा येथे ५६.३७ लाख, गुदमाच्या आवरीटोला व जमाटोला येथे ९१.५२ लाख, नवरगा खुर्द येथे ६२.४६ लाख, पांजरा येथे ८४.४० लाख, पोवारीटोला येथे ५६.३७ लाख, रापेवाडा येथे ५६.३७ लाख, सहेसपुर येथे ६५.८६ लाख, लोहारा येथे ४१.११ लाख, सतोना येथे ७६.१५ लाख, सावरी येथे ५९.४३ लाख, मोगर्रा येथे ५८.१४ लाख, गोरेगाव तालुक्यातील दवडीपार येथे ५८.१८ लाख, कलपाथरी येथे ४२.१६ लाख, मुरदोली येथे ५५.१८ लाख, पालेवाडा येथे ५५.८७ लाख, पिंडकेपार येथे ५६.३७ लाख, पुरगाव येथे ७५.१४ लाख, शहारवानी येथे ८२.४७ लाख, सडक-अर्जुनी तालुक्यातील घाटबोरी तेली येथे ४९.२२ लाख, घटेगाव येथे ४७.०४ लाख, गिरोला येथे ४९.०४ लाख, खाडीपार येथे ३३.४२ लाख, सितेपार येथे ४३.५० लाख, कोहळीटोला येथे ३९.३२ लाख, सालेकसा तालुक्यातील निंबा येथे ५८.२८ लाख, तिरोडा तालुक्यातील डब्बेटोला येथे ५९.९५ लाख, गराडा येथे ६४.२२ लाख, गुमाधावडा येथे ७०.९५ लाख, खैरलांजी येथे ३६.६८ लाख, कोडेलोहारा येथे ११४.४० लाख, मुरवाडी येथे २७.२० लाख, नवेगाव खुर्द येथे ३५.६० लाख, खुरखुडी येथे ३६.१९ लाख रूपयांचा खर्च करून स्वतंत्र योजना कार्यान्वीत केल्या जाणार आहेत. याशिवाय जिल्ह्यातील काही ठिकाणांवर पूर्वीपासूनच असलेल्या योजनांची दुरूस्ती करण्याचेही नियोजन करण्यात आले आहे. यात सडक-अर्जुनी तालुक्यातील ग्राम चिखली येथे ८१.३० लाख, डव्वा येथे १०२.२० लाख, डोंगरगाव खुर्द येथे ४२.६५ लाख, घोटी येथे ९.३२ लाख, कनेरीराम येथे ३५.९८ लाख, खजरी येथे २६.२४ लाख, पळसगाव येथे ३५.२१ लाख, सौंदड येथे २९.२४ लाख, वडेगाव येथे ३३.६५ लाख रूपये खर्च केले जाणार आहेत. तसेच सडक-अर्जुनी तालुक्यातील बाम्हणी येथे १० लाख, पुतळी येथे ६० लाख तर सालेकसा तालुक्यातील लटोरी येथे ५० लाख रूपये खर्च केले जाणार आहेत. या तिन्ही योजना प्रादेशिक नवीन पाणी पुरवठा योजनेच्या नावावर नोंद आहेत. या योजना तयार होऊन कार्यान्वीत झाल्यास पाण्यासाठी नागरिकांची भटंकती थांबणार. (शहर प्रतिनिधी) चार वर्षांत मिळणार पाणीमुख्यमंत्री ग्रामीण पाणी पुरवठा कार्यक्रम नुकताच राज्य शासनाने हाती घेतला आहे. सर्वसामान्य जनतेला पाण्याची पूर्तता करणे हा या कार्यक्रमाचा हेतू आहे. यासाठी आर्थिक वर्ष २०१६-१७ ते २०१९-२० दरम्यान लक्ष्य निर्धारीत केले आहेत. आता या कालावधीत या योजना पूर्ण होतात काय हे बघायचे आहे. वास्तवीक या कार्यक्रमातील दिशानिर्देश तय करण्यात आले आहेत. त्यातही विशेष म्हणजे निधी उपलब्ध करणे असून वेळेवर निधी मिळाल्यास या योजना वेळेत पूर्ण होणार.