शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
3
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
4
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
5
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
6
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
7
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
8
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
9
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
10
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
13
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
14
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
15
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
16
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
17
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
18
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
19
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
20
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात जिल्ह्यात २६ खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2015 02:08 IST

गोंदिया जिल्ह्याने अंहिसेचे पुरस्कर्ते असलेल्या महात्मा गांधींच्या नावाने चालणारी तंटामुक्त गाव मोहीम यशस्वीरित्या राबवून राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

खुनात घट : खुनाचा प्रयत्न करण्याच्या घटनांत मात्र वाढगोंदिया : गोंदिया जिल्ह्याने अंहिसेचे पुरस्कर्ते असलेल्या महात्मा गांधींच्या नावाने चालणारी तंटामुक्त गाव मोहीम यशस्वीरित्या राबवून राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. मात्र त्याच गोंदिया जिल्ह्यात वर्षभरात २६ जणांची हत्या व्हावी, एवढेच नाही तर २९ जणांच्या हत्येचा प्रयत्न व्हावा ही गोष्ट खटकणारी ठरत आहे.नाही म्हणायला क्राईमच्या घटनांमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत घट येत आहे. सन २०१४ च्या तुलनेत यंदा खुनाचे सहा गुन्हे कमी झाले आहे. सन २०१५ च्या ११ महिन्यात २६ खुनाचे प्रकरण घडले आहेत. मागच्या वर्षी ११ महिन्यात ३२ खून झाले होते. जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्याच्या काळात घडलेल्या २६ खुनाच्या घटनांपैकी २३ घटनांमागील आरोपींचा शोध लागला असून तीन घटनांतील आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले नाही. उलगडा होऊ न शकलेले तिन्ही खून महिलांचेच आहेत. त्या महिलांची ओळख पोलिसांना पटली नसल्याने किंवा त्यांच्या नातेवाईकांनीही शोध घेतला नसल्यामुळे हे गुन्हे उघडकीस येऊ शकले नाही. मागच्या वर्षी ११ महिन्यात ३२ खुनाचे गुन्हे घडले होते. त्यातील ३० गुन्हे उघडकीस आले होते. मागच्या वर्षी वर्षधरात एकूण ३३ खूनाचे गुन्हे दाखल झाले होते.मागच्या वर्षी खूनाचा प्रयत्न या कलमाखाली ११ महिन्यात २१ गुन्हे दाखल झाले होते. त्यातील १९ गुन्हे उघडकीस आले होते. यावर्षी २९ गुन्हे घडले असून पुूर्ण प्रकरणे उघडकीस आली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत आठ गुन्हे अधिक झाले आहेत. यावर्षी सदोष मनुष्यवधाचा एकही गुन्हा दाखल नाही. मागच्या वर्षी तीन गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यातील दोन गुन्हे उघडकीस आले असून एक गुन्हा उघडकीस आला नाही. जोरू, जर, जमीन यामुळे खुनाचे गुन्हे घडले आहेत. सर्वाधिक खुनाचे गुन्हे गोंदिया शहरात घडले आहेत. (तालुका प्रतिनिधी)