शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
3
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
4
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
5
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
6
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
7
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
8
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
9
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
10
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
11
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
12
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
13
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
14
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
15
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
16
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
17
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
18
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
19
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
20
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

२ लाख विद्यार्थी वाचणार २३ लाख पुस्तके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 05:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : दप्तर विरहीत दिन व वाचन आनंद दिन म्हणून गोंदिया जिल्ह्याने सुरूवात केली. या उपक्रमाला ...

ठळक मुद्देआज ‘वाचन प्रेरणा’ दिन : जिल्ह्यातील १६३३ शाळा सहभागी होणार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दप्तर विरहीत दिन व वाचन आनंद दिन म्हणून गोंदिया जिल्ह्याने सुरूवात केली. या उपक्रमाला अख्या महाराष्ट्रात राबविण्यात आले. १५ ऑक्टोबर रोजी एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणादिन म्हणून साजरी केली जाते. यात यंदा जिल्ह्यातील २ लाख विद्यार्थी २३ लाख पुस्तकांचे वाचन करून डॉ. कलाम यांना अभिवादन करणार आहेत.गोंदिया जिल्ह्याने सुरू केलेल्या वाचन आनंद दिन कार्यक्रमाला महाराष्ट्र शासनाने माजी राष्ट्रपती ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती (१५ ऑक्टोबर) वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरविले. त्यानुसार, गोंदिया जिल्ह्यातील १६३३ शाळेत हा दिवस साजरा करण्यात आला.यात २ लाख विद्यार्थी २३ लाख पुस्तकांचे वाचन करणार आहेत.यांतर्गत, एका विद्यार्थ्याने किमान १० पुस्तकांचे वाचन करावे लागणार आहे.प्रत्येक विद्यार्थ्याने सरासरी १० पुस्तकांचे वाचन करण्यासाठी शाळांमध्ये पुस्तके ठेवण्यात आली होती. काही शाळांमध्ये टॅब व संगणकाद्वारे ऑनलाईन पद्धतीने अधिकृत पुस्तक अ‍ॅप्स उपलब्ध करुन पुस्तकांचे वाचन करण्यात येणार आहे. जेथे पुस्तके कमी जाण्याची शक्यता होती त्या ठिकाणी सार्वजनिक ग्रंथालय, शिक्षणप्रेमी, युवक मंडळे, शिक्षक यांच्या माध्यमातून पुस्तके उपलब्ध करण्यात येतील. जिल्ह्यात १५ ऑक्टोबर रोजी सर्व शाळांमध्ये सदर कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते व नियोजनानुसार प्रत्येक विद्यार्थ्याने किमान १० (१६ पुष्ठे) पुस्तकांचे वाचन करावे लागणार आहे.कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी व्हावी याकरिता शिक्षण विभागाने केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांना नियोजनाप्रमाणे सहकार्य करणे अनिवार्य केले असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

टॅग्स :Studentविद्यार्थी