शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

१७१८ कुटुंबात फुकटात पाणी

By admin | Updated: November 15, 2015 01:16 IST

वीजेच्या मीटरमध्ये थोडी गडबड केली किंवा थेट तारांवरून वीज चोरी केली तर कारवाई होण्यास वेळ लागत नाही.

कोट्यवधीची थकबाकी : मीटरशिवाय नळाचे कनेक्शनविकास बोरकर गोंदियावीजेच्या मीटरमध्ये थोडी गडबड केली किंवा थेट तारांवरून वीज चोरी केली तर कारवाई होण्यास वेळ लागत नाही. मात्र पाण्यासारख्या मौल्यवान झालेल्या वस्तूची गोंदियात सर्रास चोरी होत आहे. गोंदिया शहरात १७१८ जण आतापर्यंत अशा पद्धतीने मीटरशिवाय पाणी वापरत असल्याचे आढळले आहेत. खुद्द महाराष्ट्र जीवन प्राधीकरणकडूनच हा आकडा उपलब्ध झाला आहे. महिन्याकाठी लाखो रुपयांचे पाणी हे लोक फुकटात वापरत असल्यामुळे जीवन प्राधीकरण विभाग अडचणीत आला आहे.या फुकट पाणी वापरणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यासाठी किंवा त्यांना रोखण्यासाठी जीवन प्राधीकरणकडे सध्यातरी कोणतीही उपाययोजना किंवा यंत्रणा नाही. गोंदिया शहरात जवळपास ५०० नळ कनेक्शन बिना मीटरने सुरू आहेत असे गृहित धरले जात होते. मात्र आता जी माहिती समोर आली त्यामुळे जीवन प्राधीकरण विभागाला चांगलाच धक्का बसला आहे. अशा प्रकारे बिना मीटरने पाणी वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढण्याची कारण म्हणजे त्या लोकांकडे असलेली जुन्या बिलाची थकबाकी. ज्या लोकांनी एकदा अधिकृतपणे नळ कनेक्शन घेतले, पण बिल भरले नसल्यामुळे ते कनेक्शन कापण्यात आले. पण त्यांनी स्वत:च प्लंबरच्या मदतीने पुन्हा थेट पाईपलाईनवरून कनेक्शन जोडून घेतले. या कामात थोडे पैसे खर्च करावे लागत असले तरी नंतर मीटरअभावी बिलच येत नसल्यामुळे अनेक ग्राहकांनी ही शक्कल लढविली आहे. यातूनच आतापर्यंत गोंदिया शहरात १७१८ कुटुंबात अशा पद्धतीने पाण्याची चोरी सुरू असल्याचे दिसून आले.कोण करणार खर्च आणि कारवाई?वीज चोरी रोखण्यासाठी महावितरणचे कर्मचारी ग्राहकाच्या घरातील विद्युत मीटर काढून नेतात, पण पाणी चोरी रोखण्यासाठी नळाचे कनेक्शन कापताना जमीन खोदावी लागते. त्यासाठी खर्च येतो. मजीप्रा जवळ या कामासाठी स्वत:चे कर्मचारी तर नाहीच पण भाड्याने मजूर लावण्याचीही सोय नाही. अशा परिस्थितीत हा खर्च करणार कोण? हा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हा खर्च करून पाण्याचे कनेक्शन कापले तरी प्लंबरच्या मदतीने पुन्हा ते कनेक्शन जोडले जाणार नाही याची शाश्वती नसते. आपल्या घरासमोरील पाईपलाईन खोदून अवैधपणे नळ कनेक्शन लावणे खूप कठीण नसल्यामुळे नळ कनेक्शन कापण्यासाठीचा खर्च करायचा का? हा महाराष्ट्र जीवन प्राधीकरणसमोर मोठा यक्षप्रश्न आहे. विशेष म्हणजे यासंदर्भात पोलिसात तक्रार करण्याचा पर्याय उपलब्ध असला तरी राजकीय दबावातून अशी कारवाई कोणावर करण्याची हिंमत मजीप्राचे अधिकारी करणार नाहीत.