शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
4
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
5
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
6
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
7
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
8
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
9
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
10
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
11
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
12
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
13
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
14
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
15
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
16
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
17
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
18
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
19
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
20
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसांत १६.३० लाखांची वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 06:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : कर न भरल्याने काहीच होत नाही या आवेशात असलेल्या व्यापाऱ्यांच्या दुकानांना सील ठोकण्यास सुरूवात ...

ठळक मुद्देसंडे अँकर । तीन दुकानांना ठोकले सील, व्यापाऱ्यांंमध्ये खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कर न भरल्याने काहीच होत नाही या आवेशात असलेल्या व्यापाऱ्यांच्या दुकानांना सील ठोकण्यास सुरूवात करताच व्यापारी नमले आहेत. यातूनच कर वसुली पथकाने दोन दिवसांत चक्क १६ लाख ३९ हजार ९०३ रूपयांची कर वसुली केली आहे. कर वसुली पथकाने तीन दुकानांना सील ठोकले असून यामुळेच आता व्यापाºयांचा प्रतिसाद मिळत असून खिशातून पैसेही निघत असल्याचे चित्र आहे.नगर परिषदेच्या दुकानांत मागील कित्येक वर्षांपासून ठाण मांडून बसलेले व्यापारी भाडे व मालमत्ता कर चुकवित आहेत. यामुळे त्यांच्यावर थकबाकी झाली असून याचा परिणाम मात्र नगर परिषदेचा कारभार चालविण्यावर होत आहे. विद्यमान मुख्याधिकारी रोहन घुगे यांनी कर विभागाचा आढावा घेतला असता त्यांना ही बाब लक्षात आली. यावर त्यांनी वाढत चाललेल्या थकबाकीवर आळा घालण्यासाठी कर विभागातील कर्मचाºयांना कर वसुली मोहीम सुरू करण्यास सांगीतले. तसेच कुणीही कर भरण्यास नकार देत असल्यास कोणत्याही प्रकारचा दबाब आणत असल्यास थेट कारवाई करण्याचे निर्देश दिले. यातूनच कर वसुली पथकाने गुरूवारी (दि.५) इंदिरा गांधी स्टेडियम मधील एक तसेच फुटपाथवरील दोन दुकानांना सील ठोकले. पथकाने केलेल्या या कारवाईचा धसका घेत व्यापारी लगेच नरमले व कराचा भरणा करण्यासाठी तयार झाले. यातूनच पथकाला गुरूवारी (दि.५) मालमत्ता करापोटी रोख तीन हजार १२० रूपये व पुढील तारखेचे एक लाख ३३ हजार २५३ रूपयांचे धनादेश प्राप्त झाले. तर दुकान भाडेपोटी चार लाख दोन हजार ८३२ रूपयांचे धनादेश व एक लाख ७६ हजार रूपये असे एकूण सात लाख १५ हजार २०५ हजार रूपयांची वसुली केली.शुक्रवारी (दि.६) पथकाने मालमत्ता करापोटी ५६ हजार ६९८ रूपयांचे धनादेश मिळविले.तर दुकान भाड्याचे पाच लाख १८ हजार रूपयांचे धनादेश व रोख तीन लाख ५० हजार रूपये असे एकूण आठ लाख ६८ हजार रूपये वसुल केले. म्हणजेच, दोन दिवसांच्या या कारवाईत पथकाने एकूण १६ लाख ३९ हजार ९०३ रूपयांची कर वसुली केली आहे. मुख्याधिकारी घुगे यांच्या आदेशानंतर पथकाने थेट दुकान सील करण्यास सुरूवात केल्याने व्यापाºयांनी धसका घेतला असून आता त्यांच्या खिशातून पैसेही निघत असल्याचे दिसत आहे.या दुकानांना ठोकले सीलकर वसुली पथकाने किशोर लारोकर यांच्या नावाने इंदिरा गांधी स्टेडियममधील दुकान क्रमांक १६ मधील सारथी कलेक्शन या दुकानाला गुरूवारी सील ठोकले. त्याचप्रकारे फुटपाथ वरील कैलाश पाल यांच्या दुकान क्रमांक २९, सुरेंद्र गंगवानी यांच्या दुकान क्रमांक २० व गीता चेलानी यांच्या दुकान क्रमांक २१ या दुकानांना सील ठोकल्याची माहिती आहे. तर दुकान क्रमांक ६ ला सील ठोकले जाणार होते मात्र प्रकाश तांडेकर या व्यापाºयाने लगेच पैसे दिल्याने त्यांची दुकान सोडण्यात आली.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिका