शहरं
Join us  
Trending Stories
1
जालन्यात मनसे आक्रमक! ॲड. गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर ओतली शाई, सुपाऱ्या फेकल्या
2
"आरोप म्हणजे शिक्षा नव्हे!" निदा खान प्रकरणात असदुद्दीन ओवेसींची एंट्री, विरोधकांना सुनावले
3
Thalapathy Vijay: 'थलपती विजय'साठी मैदान मोकळं? 'व्हीसीके'कडून 'टीव्हीके'ला बिनशर्त पाठिंब्याची घोषणा!
4
आपच्या पंजाबमधील मंत्र्याला ईडीकडून अटक, घरावर टाकलेल्या धाडीनंतर केली कारवाई   
5
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
6
आधी कथित गर्लफ्रेंडची हमाली, मग रात्री उशिरा डिनर पार्टी; अर्शदीप-समरीन जोडीचा नवा VIDEO व्हायरल
7
नाशिकच्या TCS प्रकरणावरून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा भाजपाचा डाव, काँग्रेसचा आरोप  
8
‘युझवेंद्र चहलला तुरुंगात पाठवले पाहिजे…’, भारताचा माजी क्रिकेटपटू संतापला, कारण  काय?  
9
शपथविधीनंतर सुवेंदू अधिकारी अभिवादन करण्यासाठी येताच योगींनी केलं असं काही, दिली खास भेट  
10
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
11
क्रिकेटपटू युवराज सिंगसोबत व्हायरल झालेल्या Video मधील अभिनेत्री नव्या नायर कोण आहे? पाहा PHOTOS
12
स्टार क्रिकेटर युवराज सिंगसोबत स्टेजवर असताना अभिनेत्रीने केली 'ती' कृती; Video होतोय व्हायरल
13
Ritual: महत्त्वाच्या कामाला जाताना 'दही-साखर' का खातात? केवळ श्रद्धा की विज्ञानाची जोड?
14
PM मोदी सर्वांसमोर माखनलाल सरकार यांच्या पाया पडले; या क्षणाबाबत त्यांची पत्नी म्हणते...
15
Mother's Day 2026 Wishes: जागतिक मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा मातृत्त्वाचा सोहळा
16
IPL 2026: भर मैदानात राडा? मग क्रुणाल पांड्याची इन्स्टाग्राम पोस्ट; त्यावर पूरननं केली 'अशी' कमेंट!
17
कार वापरताय? मग तुमच्या गरजेनुसार निवडा ‘हे’ विशेष ॲड-ऑन्स, वेळीच करा पैशांची बचत!
18
MCX Share Price: मार्च तिमाहीत एमसीएक्सचा नफा २९१% नं वाढला, ११ मे रोजी रॉकेट बनू शकतो शेअर
19
तामिळनाडूत सत्तेचं गणित जुळेना, विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाला विलंब, चाहत्यानं स्वत: पेटवून घेतलं!
20
नवीन फोन घेतलाय? मग 'या' ५ सेटिंग्ज लगेच करा; एका चुकीमुळे होऊ शकतं मोठं नुकसान!
Daily Top 2Weekly Top 5

सेंद्रिय शेतीतून वर्षाकाठी १३ लाखांचा नफा

By admin | Updated: December 6, 2014 01:48 IST

धानाच्या शेतीमुळे अंगावर कर्जाचा डोंगर उभा झाला. मात्र त्याच शेतीत सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून मिश्रपीक घेऊन तोट्यात असलेल्या शेतीला ...

गोंदिया : धानाच्या शेतीमुळे अंगावर कर्जाचा डोंगर उभा झाला. मात्र त्याच शेतीत सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून मिश्रपीक घेऊन तोट्यात असलेल्या शेतीला नफ्यात आणण्याची किमया झिलमिली येथील धनीराम रतिराम भाजीपाले या शेतकऱ्याने केली आहे. या वर्षात त्याने तब्बल १३ लाखांची कमाई शेतपिकातून केली.
गोंदिया तालुक्याच्या झिलमिली येथील धनीराम भाजीपाले हे आपल्या १३ एकर शेतीत धानाचे पीक घ्यायचे. मात्र धानाला भाव नसल्याने व फवारणी औषधी महागडी असल्याने ते दरवर्षी तोट्याची शेती करीत असत. परंतु शेतीतूनच आपला आर्थिक विकास साधायचा ही त्यांची मनोमन इच्छा होती. यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाकडे त्यांचा कल होता. यातच त्यांना कृषी विभागाकडून सेंद्रिय शेतीची माहिती मिळाली. त्यांनी सेंद्रिय शेतीच्या आधारावर आपल्या १३ एकरांच्या शेतात मिश्र प्रकारची शेती यशस्वी केली. त्यात सहा एकरांत केळीची बाग लावली. या केळीच्या बागेतून पहिल्या वर्षी तीन लाख, दुसऱ्या वर्षी अडीच लाख, तिसऱ्या वर्षी दोन लाख तर चौथ्या वर्षी दीड लाख रुपये मिळकत झाली. त्यांनी ७५ डिसमील शेतीत हळद लावली. त्यातून २० क्विंटल हळदीचे उत्पन्न मिळविले. काही जागेत बटाटे लावून १० क्विंटल बटाट्याचे उत्पन्न घेतले व हे बटाटे पेप्सी, कोला कंपनीला दिले.
दुधी भोपळ्यापासून एक लाख रुपये उत्पन्न घेतले. अर्धा एकरात चवळीच्या शेंगा लावून ७५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळविले. कोवळ्याचे २० क्ंिवटल उत्पादन घेतले. भेंडीचे २५ क्विंटल उत्पादन घेतले. याचबरोबर कोथिंबीर व टरबुजाचेही उत्पादन घेतले. परंतु यावर्षी टरबुजात अपयश आल्याचे भाजीपाले यांनी सांगितले.
याचबरोबर दोन एकरात लंगडा, चवसा, केशर, नागीन, आम्रपाली, सफेदा व गावराणी अशी आंब्याची झाडे लावली. या आंब्यापासून ते एक एकरामागे दोन लाख रुपयांचे उत्पन्न घेत आहेत. आता त्यांनी भेंडीच्या जागी पपई लावून विक्रमी उत्पादन घेण्याचा मानस बांधला आहे. भाजीपाले यांनी वर्षभरात २० लाख रुपयांचे उत्पादन घेतले.
त्यातील सात लाख रुपये उत्पादनावर खर्च झाले असून १३ लाखांचा निव्वळ नफा शेतीतून मिळवून आपला आर्थिक विकास साधला आहे. (तालुका प्रतिनिधी)