शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

मजीप्रा वरिष्ठांकडे मागणार १.१२ कोटी

By admin | Updated: February 16, 2015 00:01 IST

शहराला २४ तास पाणी पुरवठा करणाऱ्या वाढीव पाणी पुरवठा योजनेची पाईप लाईन टाकण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने शहरातील रस्त्यांचे खोदकाम केले आहे.

गोंदिया : शहराला २४ तास पाणी पुरवठा करणाऱ्या वाढीव पाणी पुरवठा योजनेची पाईप लाईन टाकण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने शहरातील रस्त्यांचे खोदकाम केले आहे. हे काम पूर्ण झाले नसतानाच शहरातील जुन्या दोन योजनांसाठीही रस्त्यांचे खोदकाम केले जाणार आहे. मात्र खोदण्यात आलेल्या रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी योजनेत तरतूद करण्यात आलेला निधी कमी पडत असल्याने मजीप्रा वरिष्ठांकडे १.१२ कोटी रूपयांची मागणी करणार आहे. याबाबतचा प्रस्ताव तयार असून लवकरच तो वरिष्ठांकडे पाठविला जाणार आहे. शहरातील पाण्याची समस्या लक्षात घेता शहराला २४ तास पाणी पुरवठा करणारी वाढीव पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली. या योजनेंतर्गत शहरात सुर्याटोला, सिव्हील लाईन्स व भिमनगर परिसरात तीन पाणी टंकीचे बांधकाम करण्यात आले आहे. तर या टाक्यांना ठरवून देण्यात आलेल्या परिसरात पाणी पुरवठा करण्यासाठी तेवढ्या परिसरात पाईप लाईन टाकण्यात आली आहे. अशाप्रकारे तिनही योजनांसाठी अवघ्या शहरातील रस्ते खोदण्यात आले असून त्यांची दुरूस्तीही मजीप्रालाच करावयाची आहे. ६१.३८ कोटींच्या या योजनेचे काम सुरू असून संपण्याचे नावच घेत नसल्याचे दिसून येत आहे. ही योजना तशी सन २०१३ पर्यंत पूर्ण करावयाची होती मात्र योजनेचे काम रेंगाळत चालल्याने सन २००७-०८ मध्ये तयार करण्यात आलेली ही योजना आता ठरविण्यात आलेल्या निधी पेक्षा जास्त किंमतीची होत आहे. त्यातही भिमनगरातील योजनेसाठी १३ किमी. व सिव्हील लाईन्स परिसरातील योजनेसाठी तीन किमी. रस्त्यांचे खोदकाम करावयाचे आहेच. याशिवाय रेलटोलीतील जुन्या योजनेसाठी पाच किमी. तर कृषी उत्पन्न बाजार समिती जवळील जुन्या योजनेसाठी तीन किमी. रस्ते खोदावयाचे आहेत. अशाप्रकारे एकूण २२ किमी. रस्त्यांचे खोदकाम मजीप्रा करणार आहे. अशात या रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी येणारा खर्च योजनेतील तरतूदीपेक्षा जास्त होत आहे. अशात वाढीव पाणी पुरवठा योजनेची पाईप लाईन टाकण्यासाठी खोदण्यात आलेल्या शहरातील रस्त्यांची दुरूस्ती मजीप्राला अशक्य होत आहे. तर पाईप लाईन टाकण्यासाठी खोदण्यात आलेल्या रस्त्यांची दुर्गत झाली असून यामुळे शहरवासीयांत मजीप्राप्रती चांगलाच रोष खदखदत आहे. अशात खोदण्यात आलेल्या शहरातील रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी मजिप्राला सुमारे १.१२ कोटी रूपयांचा अतिरीक्त निधी लागणार असल्याचा मजिप्राचा अंदाज आहे. त्यानुसार मजिप्रा आपल्या वरिष्ठांकडे १.१२ कोटींची मागणी करणार आहे. तर यासाठी मजिप्राने एक प्रस्ताव तयार केला असून लवकरच तो वरिष्ठांना दिला जाणार आहे. (शहर प्रतिनिधी)