शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

१११ वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले कार्यमुक्तीचे आदेश

By admin | Updated: July 7, 2014 23:37 IST

महाराष्ट्र राज्य वैद्यकीय अधिकारी राजपत्रित संघटनन्ेो (मॅग्मो) आपले असहकार कामबंद आंदोलन १ जुलैपासून राज्यस्तरावर सुरू केले. त्याचे पडसाद गोंदिया जिल्ह्यात पडून आरोग्य सेवाही काही

अस्थायी व कंत्राटींचा समावेश : आरोग्य विभागाची कारवाई
गोंदिया : महाराष्ट्र राज्य वैद्यकीय अधिकारी राजपत्रित संघटनन्ेो (मॅग्मो) आपले असहकार कामबंद आंदोलन १ जुलैपासून राज्यस्तरावर सुरू केले. त्याचे पडसाद गोंदिया जिल्ह्यात पडून आरोग्य सेवाही काही प्रमाणात ठप्प पडली होती. या आंदोलनात सहभागी झालेल्या जिल्ह्यातील एकूण १११ वैद्यकीय अधिकाऱ्यांना कार्यमुक्तीचे आदेश देण्यात आले आहेत.
कार्यमुक्त करण्यात आलेल्या या वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये अस्थायी व कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरिश कळमकर यांनी आपल्या अधिकारक्षेत्रांतर्गत येणाऱ्या एकूण २९ वैद्यकीय अधिकाऱ्यांना कार्यमुक्त केले आहे. यात २८ गट-ब चे अस्थायी वैद्यकीय अधिकारी व एक अस्थायी गट-अ च्या वैद्यकीय अधिकाऱ्याचा समावेश असल्याचे डॉ. कळमकर यांनी सांगितले. तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवी धकाते यांनी एमकेसीएसच्या अस्थायी व बंधोपत्रीत ४६ वैद्यकीय अधिकाऱ्यांना व एनआरएचएमच्या राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रमांतर्गत असणाऱ्या एकूण ३६ वैद्यकीय अधिकाऱ्यांना कार्यमुक्तीचे आदेश दिले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, जिल्हा शल्य चिकित्सकांनी आपल्या अधिकारक्षेत्रांतर्गत असणारे व मॅग्मोच्या आंदोलनात अधिक सक्रिय नसणाऱ्या केवळ सहा वैद्यकीय अधिकाऱ्यांना सोडले आहे. आणि उर्वरीत एकूण ८२ वैद्यकीय अधिकाऱ्यांना कार्यमुक्त केले आहे.
सोमवारी सायंकाळी मॅग्मोचे आंदोलन संपले अशी चर्चा होती. याबाबत गोंदिया मॅग्मोच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, अद्याप अधिकृतरित्या आंदोलन संपल्याचे घोेषित झाले नाही. मात्र सोमवारी सायंकाळी ७ वाजतापर्यंत मुंबईवरून काय सूचना मिळतात यावर ते अवलंबून होते. (प्रतिनिधी)