शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
2
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
3
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
4
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
5
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
6
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
7
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
8
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
9
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
10
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
11
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
12
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
13
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
14
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
15
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
16
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
17
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
18
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
19
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
20
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
Daily Top 2Weekly Top 5

११०० पोलिसांची चाचणी

By admin | Updated: October 12, 2015 02:04 IST

पोलीस अधिकारी, कर्मचारी, कार्यालयीन कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांकरिता पोलीस मुख्यालय (कारंजा) येथील ड्रिल शेड मध्ये मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

पोलीस मुख्यालयात आरोग्य शिबिर : पोलिसांनी केला डॉक्टरांचा सत्कारगोंदिया : पोलीस अधिकारी, कर्मचारी, कार्यालयीन कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांकरिता पोलीस मुख्यालय (कारंजा) येथील ड्रिल शेड मध्ये मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिरात ११०० पेक्षा अधिक गोंदिया जिल्ह्यातील पोलीस अधिकारी, कर्मचारी, कार्यालयीन कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांनी शिबिराचा लाभ घेतला. पोलीस अधीक्षक शशीकुमार मीना यांच्या मार्गदर्शनाखाली ६ व ७ आॅक्टोबर रोजी इमपॅथी फाऊंडेशन चेंबर, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने कारंजा पोलीस मुख्यालय येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात डोळे तपासणी, मोफत चष्मे वाटप, दातांची तपासणी व चिकित्सा, मधूमेह तपासणी, ईसीजी, बीएमआय व हाडांची तपासणी करण्यात आली. यावेळी पोलीस अधीक्षक शशीकुमार मीना, अपर पोलीस अधिक्षक डॉ. संदिप पखाले, उपअधीक्षक (गृह) सुरेश भवर व इमपॅथी फाऊंडेशन चेंबर, मुंबई येथील डॉक्टरांनी दीप प्रज्वलन करून शिबिराचे उदघाटन केले. सदर शिबिरात इमपॅथी फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी भगतसिंग पवार, नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. सुहास सावंत, डॉ. अजित भुरके, डॉ. मंगेश विश्वकर्मा, डॉ. सुरेश हसेजा, डॉ. श्वेता राणा, डॉ. शिल्पा मेश्राम, डॉ. विद्यासागर मोहन, डॉ. विलास आगासे उपस्थित होते. त्यांच्या चमूने सेवा देवून शिबिर योग्य प्रकारे पार पाडण्यास सहकार्य केले. पोलीस अधीक्षक शशीकुमार मीना व अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदिप पखाले यांच्या हस्ते डॉक्टरांना स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. सदर शिबिरात पोलीस अधीक्षक शशी कुमार मीना, अपर पोलीस अधिक्षक डॉ. संदिप पखाले, यशवंतराव सोहनी, पोलीस उपअधीक्षक सुरेश भवर, उपविभागीय पोलीस अधिकारी डी.बी. ईलमकर, परि. उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, राखीव पोलीस निरीक्षक सुनिल बाम्डेकर, जिल्ह्यातील इतर पोलीस अधिकारी, कर्मचारी, लिपीक वर्ग व त्यांच्याकुटूंबीया आरोग्य तपासणी केली.सदर शिबि यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी पोलीस उपअधीक्षक (गृह) गोंदिया सुरेश भवर, राखीव पोलीस निरीक्षक गोंदिया सुनिल बाम्डेकर, सहायक पोलीस निरीक्षक कल्याण शाखा गोंदिया अभिजीत अभंग, रापोउपनि चंद्रबहादुर ठाकुर, कल्याण शाखा येथील पोहवा सुनिल मेश्राम व राज वैद्य तसेच पोलीस मुख्यालय गोंदिया येथील नितीन तोमर, रोशन उईके, सेवक राऊत, अंकलेश येसुर यांनी सहकार्य केले. सदर शिबिराचे संचालन पोलीस अधिक्षक कार्यालयातील पोलीस उपनिरीक्षक अविनाश गडाख व आभार अपर पोलीस अधिक्षक डॉ. संदीप पखाले यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)