शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी शेतकऱ्यांत चिंता

By admin | Updated: June 26, 2014 01:25 IST

हणखणे : पावसाच्या भरवशावर नांगरलेल्या जमिनीला पाण्याची आस आहे तर तिळारी कालव्यातूनही पाणी सोडले जात नसल्याने शेतीचा प्रश्न गंभीर झाला आहे.

हणखणे : पावसाच्या भरवशावर नांगरलेल्या जमिनीला पाण्याची आस आहे तर तिळारी कालव्यातूनही पाणी सोडले जात नसल्याने शेतीचा प्रश्न गंभीर झाला आहे. अशात शेती करावी या चिंतेने हणखणे परिसरातील शेतकरी अस्वस्थ झाला आहे. पेरणीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, तालुक्यातील पाणी वाटप समित्यांनी अशा गंभीर वेळी तिळारी कालव्यातील पाणी कसे पुरविता येईल या बाबत तिळारी प्रकल्प अभियंत्यांना विचारणा करावयास हवी, अशी मागणी होत आहे. पेडणे तालुक्यातील युवक शेतीकडे वळू लागल्याचे समाधानकारक चित्र असताना यंदाचा पावसाळ्याचा पहिला महिना तर कोरडाच गेल्याने चिंतेत भरच पडली आहे. पावसाळा वेळीच सुरू झाला असता तर आता तरवा वाढून आला असता. एव्हाना लावणी सुरू झाली असती; परंतु पावसाअभावी गणिते चुकत चालली आहेत. शिवाय तिळारीतूनही पाणी सोडले जात नसल्याने कालव्यांत ही ठणठणाट आहे. गावागावांत स्थापन केलेल्या पाणी वाटप समित्या कालव्यात पाणी का नाही याबाबत मौन बाळगून असल्याचा आरोप होत आहे. अधीक्षक अभियंता एम. के. प्रसाद, शेतकी खात्याचे अधिकारी प्रसाद परब यांनीही पावसाळा सुमारे एक महिना लांबणीवर पडल्यामुळे चिंता व्यक्त केली आहे. पेरणी प्रक्रियेस उशीर होत गेल्यास ऐन भरात असताना नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान होण्याची भीती खुटवळ येथील शेतकरी अशोक सावंत यांनी व्यक्त केली आहे. तरव्यासाठी घातलेला भातही खराब होण्याच्या मार्गावर आहे. शेतात चिखल झाल्याशिवाय तरवा लावताच येत नाही. मात्र, त्यासाठी पाणी कोठून आणावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. दरम्यान, गत काही वर्षांत वन्यजीवांच्या त्रासाने शेतकरी पुरता हैराण झालेला असताना चालू वर्षी पावसाळा लांबल्याने चिंतेत भरच पडत चालली आहे. भोळा बळीराजा मात्र पावसासाठी देवाला साकडे घालत आहे. (प्रतिनिधी)