लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : सेंट फ्रान्सिस झेवियरबद्दल वादग्रस्त विधान करणारा सनातन महासंघाचा संस्थापक गौतम खट्टर अजून 'लोकेट' झालेला नाही. पोलिस टीम डेहराडूनला गेली असून तो सापडताच असेल तेथून उचलून आणू, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले. एका पत्रकार परिषदेवेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, सरकार याप्रकरणी कडक कारवाईबाबत ठाम आहे. मी स्वतः तसेच पोलिस महासंचालक, आम्ही दोघेही वैयक्तिकपणे मॉनिटरिंग करत आहोत. खट्टर याने केलेले विधान गंभीर स्वरूपाचे आहे, म्हणूनच तत्काळ टीम आम्ही डेहराडूनला पाठवली. परंतु तो अजून सापडलेला नाही.'
माधवने लिहून दिले भाषण
अधिक तपासात अशी धक्कादायक माहिती उघड झाली आहे की, गौतम खट्टरने दिलेले आक्षेपार्ह भाषण प्रत्यक्षात माधवनेच तयार केले होते. माधवने भाषण लिहून दिले आणि गौतमने ते वाचून दाखवले. हे संपूर्ण कृत्य पूर्वनियोजित होते आणि सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी माधवने त्याचे रेकॉर्डिंग केले. या गुन्ह्यातील सक्रिय सहभाग स्पष्ट झाल्यामुळे माधव खट्टर याला सह-आरोपी करण्यात आले आहे.
गौतम खट्टरने कार्यक्रमात सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह विधाने केली. यामुळे राज्यात संतापाची लाट उसळली असून ठिकठिकाणी निदर्शने करण्यात आली आहेत. राज्यातील धार्मिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी या प्रकरणाचा तपास क्राईम ब्रँचकडे सोपवला आहे. मुख्य संशयिताला पकडण्यासाठी क्राईम ब्रँचची पथके देशातील विविध शहरांमध्ये रवाना झाली असून तपास सुरू आहे.
दरम्यान, सांताक्रूझ ग्रामस्थांनी पोलिस आउटपोस्टवर खट्टर विरोधात तक्रार नोंदविली आहे. तर गोवा प्रदेश युवा काँग्रेसने पवन विजय याच्याविरोधात रायबंदर येथे क्राईम ब्रँचकडे तक्रार दाखल केली. सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबद्दल सोशल मीडियावर प्रक्षोभक आणि अपमानजनक पोस्ट केल्याचा तसेच गौतम खट्टर याच्या आक्षेपार्ह विधानांचा प्रसार केल्याचा ठपका पवन विजय याच्यावर ठेवण्यात आला आहे. काँग्रेसचे कुशावती जिल्हाध्यक्ष राजेश वेरेकर, अमित पालेकर, समील वळवईकर, जना भंडारी, विकास प्रभुदेसाई, चिराग नाईक आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
Web Summary : CM Sawant vows strict action against Gautam Khattar for offensive remarks about St. Francis Xavier. Police are searching for him in Dehradun. Shockingly, the speech was written by Madhav, now a co-accused. Complaints are filed against Pawan Vijay for spreading the remarks.
Web Summary : सीएम सावंत ने सेंट फ्रान्सिस जेवियर पर आपत्तिजनक टिप्पणी के लिए गौतम खट्टर के खिलाफ सख्त कार्रवाई का वादा किया। पुलिस उसे देहरादून में ढूंढ रही है। चौंकाने वाली बात है, भाषण माधव ने लिखा था, जो अब सह-आरोपी है। पवन विजय के खिलाफ टिप्पणी फैलाने की शिकायत दर्ज।