शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
2
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
5
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
6
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
7
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
8
विधानपरिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग! भाजपने नावे पाठवली, मविआतर्फे उद्धव ठाकरे?
9
"डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली"; 'भारताला नरक' म्हणताच अमेरिकन खासदार कृष्णमूर्ती भडकले
10
ChatGPT नं एका झटक्यात संपवली १६ अब्ज डॉलरची कंपनी; अवघ्या ४ वर्षात शेअर्समध्ये घसरण, काय घडलं?
11
राजस्थान विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी, IPL सामन्यापूर्वी जयपूरमध्ये खळबळ 
12
कित्येकींनी साकारल्या राणी सईबाई; पण जिनिलीयाला पाहून चाहते म्हणतात- "सौंदर्य आणि शक्ती..."
13
Sandeepa Virk : प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
14
ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...
15
मंत्रिमंडळात एकत्र बसायचे, बाहेर विरोधात कुरघोड्या करायच्या? शिंदे-नाईक वादावर नागरिक नाराज!
16
शाहरुखची मॅनेजर पूजा गुरनानीनं वांद्य्रात खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; एका चौरस फुटाची किंमत ₹८४,०००
17
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
18
शेजारणीकडे दिली घराची चावी अन् तिजोरीच गायब, ३४ लाख रुपयांचे दागिने चोरीला!
19
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
20
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
Daily Top 2Weekly Top 5

व्ही. एम. प्रभुदेसार्इंची

By admin | Updated: June 18, 2014 07:25 IST

पणजी : सरकारने मंगळवारी अचानक एका आदेशाद्वारे क्रीडा खात्याचे संचालक व्ही. एम. प्रभुदेसाई यांची बदली केली असून ब्राझील दौऱ्याच्या वादाचा

पणजी : सरकारने मंगळवारी अचानक एका आदेशाद्वारे क्रीडा खात्याचे संचालक व्ही. एम. प्रभुदेसाई यांची बदली केली असून ब्राझील दौऱ्याच्या वादाचा हा परिणाम असल्याची जोरदार चर्चा राजकीय गोटात व प्रशासकीय पातळीवर सुरू झाली आहे. ब्राझीलचा दौरा करण्याची काही मंत्री व सत्ताधारी पक्षाच्या आमदारांची योजना टीकेमुळे अयशस्वी ठरली. काही अधिकारी व दोघा क्रीडापटूंचीही नावे अगोदर ब्राझील दौऱ्याच्या यादीत होती. तथापि, या योजनेची बातमी बाहेर फुटण्यामागे काही अधिकारी जबाबदार असल्याचा संशय सरकारमधील काही घटकांना आला आहे. प्रभुदेसाई यांची बदली हा त्याचाच परिणाम असल्याची चर्चा आहे. प्रभुदेसाई यांची बदली व नियुक्ती आता त्यांच्या पूर्वीच्या पदी म्हणजे उपसंचालक, शारीरिक शिक्षण व युवा सेवा या जागी करण्यात आली आहे. एक प्रकारे ही पदावनती असल्याचेही मानले जात आहे. सरकारच्या या नव्या भूमिकेबाबत क्रीडा क्षेत्रात मात्र नाराजीचा सूर आहे. क्रीडा खात्याच्या संचालकपदी वाय. बी. तावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तावडे हे मुरगाव पालिकेचे मुख्याधिकारी होते. त्यांच्या जागी आता सुनील मसुरकर यांची नियुक्ती झाली आहे. उत्तर गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी अरविंद बुगडे यांची नियुक्ती दक्षिण गोव्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारीपदी झाली आहे. दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी मिहिर वर्धन यांना पुन्हा उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकारीपदी आणण्यात आले आहे. पंचायत खात्याचे संचालक नारायण सावंत यांची बदली करून त्यांना मडगाव पालिकेच्या मुख्याधिकारीपदी आणण्यात आले आहे. सिद्धिविनायक नाईक यांना सरकारने कोणतेच पद दिले नव्हते. त्यांची नियुक्ती आता आयडीसीच्या विशेष भू-संपादन अधिकारीपदी करण्यात आली आहे. मोपा विमानतळ प्रकल्पाशी संबंधित भूसंपादन पदाचाही अतिरिक्त ताबा त्यांच्याकडे देण्यात आला आहे. संयुक्त मुख्य निवडणूक अधिकारी नारायण नावती यांच्याकडे पंचायत संचालकपदाचा अतिरिक्त ताबा देण्यात आला आहे. विजय परांजपे यांच्याकडे शिष्टाचार खात्याच्या संयुक्त सचिवपदाचा अतिरिक्त ताबा, आयडीसीचे व्यवस्थापकीय संचालक एस. व्ही. नाईक यांच्याकडे उद्योग खात्याच्या संचालकपदाचा अतिरिक्त ताबा सोपविण्यात आला आहे. (खास प्रतिनिधी)