दोघा चोरट्यांचे पलायन; एकास शिताफीने पकडले

By Admin | Updated: June 8, 2014 01:24 IST2014-06-08T01:21:45+5:302014-06-08T01:24:27+5:30

हणजूण : हणजूण पोलीस ठाण्याच्या कोठडीतील स्वच्छतागृहास भगदाड पाडून पलायन केल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला.

Two thieves flee; One caught up sharply | दोघा चोरट्यांचे पलायन; एकास शिताफीने पकडले

दोघा चोरट्यांचे पलायन; एकास शिताफीने पकडले

हणजूण : हणजूण पोलीस ठाण्याच्या कोठडीतील स्वच्छतागृहास भगदाड पाडून पलायन केल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला. दोघांपैकी एकास पकडण्यात हणजूण पोलिसांना यश आले. दरम्यान, पोलीस कर्मचारी नित्यानंद हळर्णकर, गुरुनाथ नाईक व संजय गावडे यांना कामात हलगर्जी केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आल्याचे उपअधीक्षक महेश गावकर यांनी सांगितले. हणजूण पोलीस ठाण्याचे निरीक्षक परेश नाईक यांनी ओंकार यास पकडण्यात तत्परता दाखविल्याचे उपअधीक्षक गावकर यांनी पत्रकारांना सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Two thieves flee; One caught up sharply