शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

अवैध रेती उपशाप्रकरणी गोव्यात दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2020 12:33 PM

अवैध रेती उपशाप्रकरणी उच्च न्यायालयाने कडक भूमिका घेतलेली असतानाही गोव्यात बेकायदेशीररीत्या रेती उपसा केला जात

मडगाव: अवैध रेती उपशाप्रकरणी उच्च न्यायालयाने कडक भूमिका घेतलेली असतानाही गोव्यात बेकायदेशीररीत्या रेती उपसा केला जात असून, राज्यातील दक्षिण गोव्यातील सोनशे-कुडतरी येथे नदीच्या पात्रात बेकायदेशीर रेती उपसा केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. क्लेमंट फर्नांडिस (४६ ) व मुकुंद परब (४0) अशी संशयितांची नावे आहेत. मायणा-कुडतरी पोलिसांनी ही कारवाई केली. काल गुरुवारी रात्री सोनशे - कुडतरी येथे एका कारवाई पोलिसांनी पंधरा क्युबिक मीटर रेती जप्त केली होती. घटनास्थळी एक होडी , पाणी खेचणारे एक पाईपही जप्त करण्यात आले होते.सासष्टी तालुक्याचे मामलेदार प्रतापराव गावकर हे तक्रारदार आहेत. गुरुवारी सासष्टी मामलेदार , पोलीस , कॅप्टन ऑफ पोर्टस, जलस्त्रोत खाते तसेच खाण संचलनालयाने एक संयुक्त पाहणी केली होती. यात सोनशे येथे नदीच्या पात्रात अवैध रेती उपसा केली जात असल्याचे या पथकाला आढळून आले. घटनास्थळी रेती उपसासाठी वापरले जाणारी वस्तूही सापडल्या. सकाळी साडेनऊ वाजता वरील पथकाने ही कारवाई केली. भारतीय दंड संहितेच्या ३२९ व २१ खाण व खनिज कायद्यांतर्गंत त्यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे. मायणा - कुडतरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुरुदास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महेश वेळीप हे पुढील तपास करीत आहेत.