शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात गडगडाटासह मुसळधार; जोरदार वारे आणि पडझड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 21:45 IST

गोव्यात आज भर दुपारी काळ्याकुट्ट ढगांनी आभाळ दाटले आणि मोठ्या गडगडाटासह सुमारे एक ते दीड तास मुसळधार पावसाने राज्याच्या विविध भागांना झोडपून काढले.

पणजी : गोव्यात आज भर दुपारी काळ्याकुट्ट ढगांनी आभाळ दाटले आणि मोठ्या गडगडाटासह सुमारे एक ते दीड तास मुसळधार पावसाने राज्याच्या विविध भागांना झोडपून काढले. एक ते दीड तासाच्या पवसाने सर्वत्र दाणादाण उडविली. जोरदार वा-यामुळे अनेक ठिकाणी पडझडही झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, हवामान खात्याने नैऋत्य मान्सून देशभरातून माघारी परतल्याचे अधिकृतपणे जाहीर केले आहे. ईशान्येचा पाऊस तामीळनाडूत सक्रीय आहे, त्याचे परिणाम गोव्यात दिसून येत असून पुढील तीन दिवस गडगडाटासह जोरदार वारा-पाऊस होईल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

नैऋत्य मान्सून माघारी परतल्याचे जाहीर हवामान वेधशाळेचे संचालक के. व्ही. पडगीलवार म्हणाले की, ‘गोव्यासह देशभरातून मान्सून माघारी परतल्याची घोषणा आज दुपारी अधिकृतपणे करण्यात आलेली आहे. नैऋत्य मान्सूनची माघार राजस्थानहून सुरु होते. मंगळवारी रत्नागिरीपर्यंत मान्सूनने माघार घेतली होती. तामीळनाडूमध्ये सध्या जी मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरु आहे ती ईशान्य पावसाची आहे. त्याचे परिणाम गोव्यात दिसून येत आहेत. पुढील दोन ते तीन दिवस ढगाळ वातावरण, गडगडाट आणि जोरदार पावसाची शक्यता आहे.’

बुधवारी दुपारी ४ च्या सुमारास राजधानी शहरासह आजुबाजुचा परिसर तसेच अनेक गावांमध्येही काळे ढग आभाळात दाटून आले. गडगडाट आणि विजा चमकून जोरदार वाºयासह मोठ्या थेंबांचा जोरदार पाऊस सुरु झाला. यामुळे लोकांची तारांबळ उडाली. गेले दोन तीन दिवस हवेतील उष्मा मोठ्या प्रमाणात वाढला होता. बुधवारी सकाळपासूनच अंगाची लाही लाही होत होती. 

....................

ताळगाव येथे घरावर झाड कोसळले; अनेक ठिकाणी पडझड 

वरील दोन तासांच्या कालावधीत अग्निशामक दलास पणजी व आजुबाजुच्या परिसरातून पडझडीचे सात ते आठ कॉल्स आले. शंकरवाडी, ताळगांव येथे परेश नाईक यांच्या घरावर झाड कोसळल्याने त्यांची सुमारे अडीच लाख रुपयांची हानी झाली. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी मात्र टाळली. मळा येथे रस्त्यावर झाड कोसळले. जुन्या सचिवालयाजवळ, टोंक येथे रस्त्यावर तसेच आल्तिनो येथेही झाडे उन्मळून पडली. अग्निशामक दलाचे जवान सायंकाळी उशिरापर्यंत हे अडथळे दूर करण्याच्या कामात व्यस्त होते.