शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

तीन तालुक्यांत उद्यापर्यंत ‘ड्राय डे’

By admin | Updated: October 14, 2014 01:46 IST

पणजी : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनिमित्त गोव्यातील तीन तालुक्यांतील दहा पंचायत क्षेत्रांतील एकूण पंधरा गावांमधील मद्यालये बंद ठेवण्याचा आदेश जारी झाला आहे.

पणजी : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनिमित्त गोव्यातील तीन तालुक्यांतील दहा पंचायत क्षेत्रांतील एकूण पंधरा गावांमधील मद्यालये बंद ठेवण्याचा आदेश जारी झाला आहे. गोवा सरकारच्या अर्थ खात्याने याबाबतचा आदेश जारी केला आहे. डिचोली, सत्तरी व पेडणे हे गोव्याचे तीन तालुके महाराष्ट्राच्या सीमेवर वसले आहेत. सोमवारी सायंकाळी ५ वाजल्यापासून या तालुक्यांतील पंधरा गावांतील मद्यालये बंद झाली. दि. १५ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ही मद्यालये बंद राहतील. त्यानंतर १९ रोजी सकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत मद्यालये उघडता येणार नाहीत, असे अर्थ खात्याच्या आदेशात म्हटले आहे. दि. १९ हा महाराष्ट्रात मतमोजणीचा दिवस आहे. डिचोली तालुक्यातील लाटंबार्से पंचायत क्षेत्रातील दोडामार्ग व खरपाल भाग तसेच साळ पंचायत क्षेत्रातील खोरगिरे व खोलपे येथे मद्यालये सुरू ठेवता येणार नाहीत. पेडणे तालुक्यातील केरी पंचायत क्षेत्रातील तेरेखोल, तोर्से पंचायत क्षेत्रातील पत्रादेवी, इब्रामपूर पंचायत क्षेत्रातील हणखणे व हादूस येथे आणि पालये पंचायत क्षेत्रातील किरणपाणी येथे मद्यालये सुरू ठेवता येणार नाहीत. सत्तरी तालुक्यातील केरी पंचायत क्षेत्रातील शिरोली व रावण कॉलनी येथे मद्यालये सुरू ठेवता येणार नाही, असे आदेशात म्हटले आहे. म्हावळींगे व कुडचिरे या डिचोली तालुक्यातील गावांतही मद्यालये बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या तिन्ही तालुक्यांतील अबकारी अधिकाऱ्यांना सतर्क करण्यात आले आहे. या तिन्ही तालुक्यांतील गावांमध्ये कोण किती प्रमाणात मद्य स्वत:जवळ ठेवू शकतो किंवा त्याची वाहतूक करू शकतो याचे नवे प्रमाणही निवडणूक काळापुरते निश्चित करण्यात आले आहे. (खास प्रतिनिधी)