गावागावातील मंदिरे एकतेचे प्रतीक : मुख्यमंत्री सावंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 11:38 IST2026-05-06T11:38:13+5:302026-05-06T11:38:45+5:30

तिखाजन मये येथे तळेश्वर लिंग प्रतिष्ठापना सोहळा, मान्यवरांचा केला सन्मान

temples in villages are a symbol of unity said cm pramod sawant | गावागावातील मंदिरे एकतेचे प्रतीक : मुख्यमंत्री सावंत

गावागावातील मंदिरे एकतेचे प्रतीक : मुख्यमंत्री सावंत

लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली: प्राचीन काळापासून गावागावातील मंदिरे ही त्या त्या गावाच्या एकतेचे व संपन्नतेचे प्रतीक मानली जात आहे. मंदिरांच्या माध्यमातून गावकरी एकत्र येत गावाच्या हिताचे निर्णय घेत सामाजिक व सांस्कृतिक एकोपा जपतात, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

तिखाजन मये येथे तळेश्वर लिंग प्रतिष्ठापना, गणेश व हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा तसेच शिखर कलशारोहण सोहळा पाच दिवस उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्याच्या समारोपप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. या वेळी आमदार प्रेमेंद्र शेट तसेच विशांत पेडणेकर, धर्मा चोडणकर, रुपेश ठाणेकर, सागर ठाणेकर, उदय पत्रे, प्रताप पत्रे, सप्नेश ठाणेकर, महेंद्र मणेरीकर, राया ठाणेकर, सिद्धार्थ पत्रे, सुखानंद पंढरी आणि रुपेश लिंगडकर, कमलाकांत तारी सर्व पदाधिकारी ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, गावकऱ्यांनी शैक्षणिक विकासासोबतच मंदिर उभारून संस्कृती व परंपरेचे जतन करत एक आदर्श निर्माण केला आहे. ही बाब प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.

संस्कृती संवर्धनाचा संगम : प्रेमेंद्र शेट

आमदार प्रेमेंद्र शेट यांनीही मार्गदर्शन करत संस्थेने व ग्रामस्थांनी एकत्र येऊन शैक्षणिक संस्थेच्या प्रांगणात मंदिर उभारून एकतेचे उत्तम उदाहरण सादर केल्याचे सांगितले. हा उपक्रम सामाजिक ऐक्य व संस्कृती संवर्धनाचा सुंदर संगम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हा संपूर्ण सोहळा पुरोहित वेदशास्त्र संपन्न महेंद्र मणेरीकर यांच्या मार्गदर्शनाखाली धार्मिक विधींनी पार पडला. शिखर कलश प्रतिष्ठापना पतंजली योगपीठ हरिद्वारचे स्वामी यज्ञदेव यांच्या हस्ते करण्यात आली.

विज्ञानानंद ज्ञानप्रसारक संस्था व कार्यकारी मंडळाने ग्रामस्थांच्या सहकार्याने या भव्य सोहळ्याचे आयोजन केले होते. कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते भजनी कलाकार, देणगीदार व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. तसेच युवा गायक राजयोग धुरी यांच्या गायन मैफलीने उपस्थितांची मने जिंकली. या सोहळ्याला मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
 

Web Title : गाँवों के मंदिर एकता के प्रतीक: मुख्यमंत्री सावंत

Web Summary : मुख्यमंत्री सावंत ने कहा कि गाँव के मंदिर एकता और समृद्धि का प्रतीक हैं। उन्होंने तिखाजन माये में एक मंदिर कार्यक्रम में बोलते हुए मंदिरों और शिक्षा के माध्यम से संस्कृति और परंपरा को संरक्षित करने के महत्व पर जोर दिया। विधायक शेटे ने एक शिक्षण संस्थान के भीतर मंदिर के निर्माण द्वारा प्रदर्शित एकता पर प्रकाश डाला।

Web Title : Temples in villages symbolize unity: Chief Minister Sawant.

Web Summary : Chief Minister Sawant stated that village temples symbolize unity and prosperity. He spoke at a temple event in Tikhajan Maye, emphasizing the importance of preserving culture and tradition through temples and education. MLA Shete highlighted the unity exemplified by the temple's construction within an educational institution.