शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

खनिज वाहतुकीबाबत एसओपी पाळावीच लागेल; हायकोर्टाचा सरकारला आदेश

By वासुदेव.पागी | Updated: July 3, 2024 15:55 IST

खनिज वाहतूकदारांना झटका

वासुदेव पागीपणजी: गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ  आणि संचालनालयाने जारी केलेल्या मानक कार्यप्रणालीचे ( एसओपी)  काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश गोवा येथील मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिल्याने खाण क्षेत्रात राहणाऱ्या गावकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

 न्यायालयाने म्हटले आहे की, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि खाण खात्याच्या शिफारशीवर दुर्लक्ष करता येणार  नाही. तज्ज्ञाच्या सल्यांचा आदर राखलाच पाहिजे असेही न्यायालयाने नमूद केले आहे.  खनिजाच्या वाहतुकीदरम्यान  कोणत्याही नियम -निकशांच्याउल्लंघनास गांभीर्याने सामोरे जावे लागेल असा इशाराही दिला आहे. 

 न्यायालयाने पुढे सांगितले की याचिकाकर्त्यांनी केलेल्या सूचनांना प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून  आणि खान खात्याकडून   योग्य महत्त्व दिले जावे आणि या दोघांनी वाहतुकी दरम्यान आधुनिक तंत्रांचा अवलंब करून संतुलन साधण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला पाहिजे.

 प्रत्येक रस्त्याच्या वहन क्षमतेच्या आधारे गावांमधून खनिज वाहतुकीसाठी परवानगी दिलेल्या प्रत्येक मार्गाचा विशिष्ट अहवाल तयार करून योग्य अभ्यास करावा.  मार्गाची लांबी, लोकसंख्येचा अभ्यास करून मार्गावर वसलेली घरे,वाड्यांची संख्या, शाळांचे तपशील किंवा इतर व्यतिरिक्त मार्गावर अस्तित्वात असलेल्या  इतर उपक्रमांचा विचार व्हावा असेही आदेशात म्हटले आहे.

खाण खाते  आणि पिरदूषण नियंत्रण मंडळ प्रत्येक मार्गावरील ट्रकचे रिअल टाईम आधारावर निरीक्षण करतील, पंचायत घरे किंवा सार्वजनिक शाळा परीसर  सीसीटीव्ही कॅमेर्यांद्वारे जोडले जाईल तसेच खाणखात्याकडून त्यावर देखरेख ठेवली जाईल असेही आदेशात म्हटले आहे.    वेळेचे उल्लंघन

 पहाटे 4.30 ते सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत ट्रकमधून खनिजाची सतत वाहतूक करण्यास बंदी असतानाही त्याते उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले असे आदेशात म्हटले आहे.

टॅग्स :goaगोवा