शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
2
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
3
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
4
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
5
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
6
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
7
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
8
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
9
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
10
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
11
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
12
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
13
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
14
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
15
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
16
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
17
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
18
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
19
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
20
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

पार्सेकरांच्या आक्षेपानंतरही सोपटेंना भाजपमध्ये प्रवेश?

By admin | Updated: June 18, 2014 07:24 IST

पणजी : भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष व विद्यमान आरोग्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा पेडण्याचे माजी आमदार दयानंद सोपटे यांना भाजपमध्ये फेरप्रवेश देण्यास

पणजी : भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष व विद्यमान आरोग्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा पेडण्याचे माजी आमदार दयानंद सोपटे यांना भाजपमध्ये फेरप्रवेश देण्यास आक्षेप असल्याची माहिती पक्षाच्या सूत्रांकडून मिळाली. मात्र, पार्सेकर यांच्या आक्षेपानंतरही सोपटे यांना पक्ष प्रवेशाचा मार्ग खुला करण्याचे प्रयत्न काहीजण करत असून त्यात त्यांना यश येऊ शकते, अशी माहिती उच्चस्तरीय सूत्रांकडून प्राप्त झाली. यापूर्वी अनेकांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली. यात डॉ. सुरेश आमोणकर, प्रकाश फडते, अ‍ॅड. रमाकांत खलप, रवी नाईक, पांडुरंग राऊत, रमाकांत आंगले, मिकी पाशेको, बाबूश मोन्सेरात आदींचा समावेश आहे. या काही नेत्यांपैकी बहुतेकजण हे भाजपमध्ये थांबण्यासाठी आले नव्हतेच. ते मुळातच बिगरभाजप असे नेते होते. बहुतांशजण काँग्रेसमधून आले होते. त्यामुळे त्यांनी पक्ष सोडला तेव्हा पक्षाला त्याबाबत जास्त दु:ख झाले नाही. दिगंबर कामत, राजेश पाटणेकर व दयानंद सोपटे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली, त्या वेळी मात्र भाजपला जास्त दु:ख झाले, असे पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने ‘लोकमत’ला सांगितले. पाटणेकर, सोपटे, कामत वगैरे भाजपमध्येच तयार झाले होते व भाजपच्या कार्यकर्त्यांच्या बळावर ते निवडून आले होते. त्यामुळे त्यांनी पक्ष सोडला तेव्हा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासह पक्षातील अनेकांना धक्का बसला. यापैकी कामत यांचा राजकीयदृष्ट्या फायदा झाला. त्यांना काँग्रेसमध्ये गेल्यानंतर लगेच मुख्यमंत्रिपद मिळाले. सोपटे किंवा पाटणेकर यांना मात्र भाजपला सोडचिठ्ठी देणे राजकीयदृष्ट्या संकटात नेणारे ठरले. सोपटे हे एकेकाळी मंत्री पार्सेकर व भाजपचे संघटनमंत्री सतीश धोंड यांचे शिष्य मानले जात होते. नंतर अचानक त्यांनी काँग्रेसचे आमदार विश्वजित राणे यांचे शिष्यत्व पत्करले. सोपटे यांचा नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीवेळी भाजपमध्ये प्रवेश झाला असता. तथापि, मंत्री पार्सेकर यांनी तीव्र आक्षेप घेतल्याने त्यांचा प्रवेश अडला होता. जे पक्ष सोडून जातात, त्यांचे बाहेर साधले नाही की मग त्यांनी पुन्हा भाजपमध्ये येणे व पक्षाने त्यांचे स्वागत करणे हा चुकीचा पायंडा ठरेल, अशा भावना मंत्री पार्सेकर यांनी यापूर्वी भाजपच्या श्रेष्ठींना कळविल्या असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. आता पार्सेकर यांचा विरोध असतानाही सोपटे यांना भाजपमध्ये प्रवेश मिळू शकतो. (खास प्रतिनिधी)