हजाराच्या नोटेतील साधे अन् छान नाट्य

By Admin | Updated: June 8, 2014 01:24 IST2014-06-08T01:23:42+5:302014-06-08T01:24:42+5:30

पणजी : एक हजाराची नोट...साधी नोट...पण मिळते ती खेडेगावातील एका वृद्धेला...निवडणुकीदरम्यान नेत्याकडून मिळालेल्या या नोटेने घडवलेला राजकीय प्रवास एक

Simple and beautiful drama in Hazare's note | हजाराच्या नोटेतील साधे अन् छान नाट्य

हजाराच्या नोटेतील साधे अन् छान नाट्य

पणजी : एक हजाराची नोट...साधी नोट...पण मिळते ती खेडेगावातील एका वृद्धेला...निवडणुकीदरम्यान नेत्याकडून मिळालेल्या या नोटेने घडवलेला राजकीय प्रवास एक ‘हजाराची नोट’मध्ये मांडलेला आहे. साधेपणातील नाट्य साधेपणाने मांडले आहे, जे हृदयस्पर्शी झालेले आहे. या चित्रपटाची सर्वात जमेची बाजू म्हणजे साधेपणा आणि टाळलेली कृतकता.
निर्माते आहेत शेखर साठे आणि दिग्दर्शक श्रीहरी साठे. शनिवारी या चित्रपटाचा खेळ झाला. त्यास प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला. पत्रकार आणि लेखक श्रीकांत बोजेवार यांच्या लेखणीतून उतरलेला हा चित्रपट प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाईक, पूजा नाईक, देवेंद्र गायकवाड आणि गणेश यादव यांनी नितांत सुंदर अभिनय केलेला आहे.
वृद्धेच्या पतीचे निधन झाले आहे, कर्जबाजारीपणामुळे मुलाने आत्महत्या केली आहे. या कौटुंबिक स्थितीत निवडणुका लागतात आणि भाषणानंतर नेता नोटा वाटतो. या वृद्धेची स्थिती ऐकून तो हजाराच्या नोटा देतो आणि पुढील रामायण घडते. जे आपल्याला लोकशाहीतील शोषक आणि शोषितांमधील अंतराचे भयावह दर्शन घडवते.
महाराष्ट्रात या चित्रपट प्रदर्शित झालेला आहे. महाराष्ट्राबाहेर विविध महोत्सवांच्या माध्यमातून हा चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो आहे. हा आनंद मोठा आहे. अमराठी प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळतो आहे, असे निर्माते शेखर साठे यांनी सांगितले. या चित्रपटाचे स्वतंत्र डबिंग केलेले नाही, अशी माहितीही त्यांनी दिली.
(खास प्रतिनिधी)

Web Title: Simple and beautiful drama in Hazare's note