शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

म्हापशात उभारला शिवरायांचा पहिला अश्वारूढ पुतळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 15:06 IST

हुतात्मा चौक ते गांधी चौक परिसराचे सौंदर्यीकरण केले जाणार असून याअंर्तगत हा अश्वारूढ शिवरायांचा पुतळा उभारला आहे.

म्हापसा : शहरात शिवरायांचा अश्वारूढ पुतळा नव्हता. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची प्रलंबित मागणी पूर्ण झाली असून १२ फूट उंच अश्वारूढ पूर्णाकृती असा महाराजांचा पुतळा येथील हुतात्मा चौकासमोर बसविण्यात आला आहे. ही म्हापसावासीयांसह शिवप्रेमींसाठी मोठी आनंदाची बातमी असली तरीही या पुतळ्यांचे अनावरण जिल्हा पंचायतीच्या आचारसंहितेमुळे सध्या लांबणीवर पडले आहे.या अश्वारूढ पुतळ्याची मूळ प्रतिकृती ही कलाकार सचिन मदगे यांनी बनवली आहे. ही मूर्ती पुण्यात तयार केली असून ती पितळेची आहे. हा पुतळा दहा फुटी बांधलेल्या फलाटावर उभारला आहे. मात्र, सध्या जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे आचारसंहिता हटविल्यानंतरच या पुतळ्याचे अधिकृतरित्या उद्घान होणार असल्याची माहिती मिळाली आहे.हुतात्मा चौक ते गांधी चौक परिसराचे सौंदर्यीकरण केले जाणार असून याअंर्तगत हा अश्वारूढ शिवरायांचा पुतळा उभारला आहे. हे काम रोटरी क्लब ऑफ  म्हापसा सिटीमार्फत होत आहे. यापूर्वी हुतात्मा चौकात शिवाजी महराजांचा अर्धपुतळा होता. मात्र, सध्या हा पुतळा हटवून आता अश्वारूढ महाराजांचा पुतळा उभारला आहे.या सौंदर्यीकरणासह शिवरायांच्या पुतळ्यासाठी ४० लाखांची तरतूद केलेली. मात्र, हा खर्च वाढण्याची शक्यता आहे. महाराजांचा पुतळा हा पितळ्याचा बनविला असून याचे वजन २५०० किलो म्हणून अडीज टन आहे. यात पुतळ्याचा खर्च हा २५ लाख आहे. दि. २४ जानेवारी २०१९ रोजी म्हापसा नगरपालिकेने ठराव मंजूर घेत शिवरायांचा पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला होता.दरम्यान, म्हापसा पालिका, शिवप्रेमी व इतर चाहत्यांनी दि. १६ रोजी पूर्वीचा शिवरायांचा अर्धपुतळा हटवून तो एका विशिष्ट जागेत ठेवण्यात आला. 

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजgoaगोवा