शिवसेनेचा गोव्यात सत्ता स्थापनेचा निर्धार: उदय सामंत; शिंदे गटाचा मेळावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 13:49 IST2026-05-19T13:47:07+5:302026-05-19T13:49:42+5:30

२०२७ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना तब्बल ३० जागा लढवणार असून गोव्यात सत्ता स्थापन करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.

shiv sena determined to form government in goa said uday samant eknath shinde group meet | शिवसेनेचा गोव्यात सत्ता स्थापनेचा निर्धार: उदय सामंत; शिंदे गटाचा मेळावा

शिवसेनेचा गोव्यात सत्ता स्थापनेचा निर्धार: उदय सामंत; शिंदे गटाचा मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली: गोवा राज्य शिवसेना पक्षाची राज्य कार्यकारिणी बैठक येथील हिराबाई झांट्ये सभागृहात झाली. आगामी २०२७ च्या गोवा विधानसभा निवडणुकीत शिवसेना तब्बल ३० जागा लढवणार असून गोव्यात सत्ता स्थापन करण्याचा निर्धार पक्षाने केल्याचे महाराष्ट्राचे उद्योगमंत्री तथा शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी यावेळी सांगितले. डिचोली येथे शिवसेने शिंदे गटाचा राज्य कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता.

या मेळाव्यात शिवसेनेचे नेते व गोवा राज्य संपर्क प्रमुख गजानन कीर्तीकर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सचिव बालाजी खतगावकर, शिवसेनेचे महाराष्ट्र सचिव संजय मोरे, स्थानिक लोकाधिकार सेनेचे सरचिटणीस अरुण मोरे, गोव्याचे संपर्क प्रमुख सुभाष सावंत, राज्य प्रमुख उपेंद्र गावकर, राज्य सचिव काशिनाथ मयेकर, दक्षिण गोवा जिल्हा संपर्कप्रमुख प्रकाश पावसकर, उत्तर गोवा जिल्हा संपर्कप्रमुख मिलिंद प्रधान तसेच मुंबईचे विभाग प्रमुख राजू पेडणेकर व दिलीप नाईक आदी उपस्थित होते.

बैठकीत उदय सामंत म्हणाले की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोव्यात निवडणूक लढवण्याची पूर्ण तयारी केली आहे. आम्ही केवळ निवडणूक लढवण्यासाठी नव्हे, तर गोव्यात थेट सत्ता स्थापन करण्यासाठी २०२७ ची रणधुमाळी गाजवणार आहोत. पक्ष कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही. ज्या उमेदवारांमध्ये निवडून येण्याची आणि काम करण्याची क्षमता असेल, त्यांनाच पक्षाकडून उमेदवारी दिली.
 

Web Title : गोवा में सरकार बनाएगी शिवसेना: उदय सामंत

Web Summary : शिवसेना का लक्ष्य 2027 के गोवा चुनावों में 30 सीटों पर चुनाव लड़कर सत्ता स्थापित करना है। उदय सामंत ने शिंदे गुट की बैठक में यह घोषणा की, जिसमें जीतने की तैयारी और उम्मीदवार चयन पर बाहरी दबावों को अस्वीकार करने पर जोर दिया गया।

Web Title : Shiv Sena Aims to Establish Government in Goa: Uday Samant

Web Summary : Shiv Sena plans to contest 30 seats in the 2027 Goa elections, aiming to establish power. Uday Samant announced this at a Shinde faction meeting, emphasizing readiness to win and rejecting external pressures on candidate selection.