शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

कोलव्यात शॅक्सचे सांडपाणी किनाऱ्यावर, जमिनीची धूप झाल्याने बेकायदेशीरपणा उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2019 21:59 IST

कोलव्यात खासगी जमिनीत उभ्या केलेल्या शॅक्सचे सांडपाणी समुद्र किना-यावर कुठलीही प्रक्रिया न करता सोडले जाते हे उघडकीस आले आहे.

मडगाव: कोलव्यात खासगी जमिनीत उभ्या केलेल्या शॅक्सचे सांडपाणी समुद्र किना-यावर कुठलीही प्रक्रिया न करता सोडले जाते हे उघडकीस आले असून, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यटन खात्याने या बेकायदेशीरपणाकडे गंभीरपणे लक्ष वेधून चौकशीचे आदेश दिले आहेत. दोन दिवसांपूर्वी वादळामुळे दर्याचे पाणी किना-यावर येऊन कोलवा किना:याची मोठय़ा प्रमाणावर जी धुप झाली होती त्यातून हा बेकायदेशीर प्रक़ार उघडकीस आला.कोलव्यात खासगी जमिनीत जे शॅक्सक्स आहेत त्यांचे सांडपाणी आतार्पयत पाईपद्वारे किना-यावर सोडले जात होते.  पण हा बेकायदेशीरपणा उघडकीस येऊ नये म्हणून हे पाईप्स रेतीखाली गाडले गेले होते. मात्र वादळी वा-यामुळे खवळलेल्या दर्याने किना-यावरची वाळू विस्कळीत करुन टाकल्याने वाळू खाली दडवलेले हे पाईप्स उघडे पडले. शनिवारी त्यामुळे या भागात बोभाटाही झाला.सोमवारी किनारपट्टीची पहाणी केली असता ते पाईप्स पुन्हा एकदा मातीखाली गाडले गेले आहेत असे दिसून आले. वास्तविक किनारपट्टी नियमन कायद्याप्रमाणे अशाप्रकारे सांडपाणी किना-यावर सोडल्यास त्या आस्थापनाची परवानगी काढून घेण्याची तरतूद आहे. यासंदर्भात पर्यटन संचालक संजीव गडकर यांना विचारले असता, या घटनेची आम्ही दखल घेतली असून किना-याची पहाणी करुन खात्याला अहवाल पाठवावा असे पर्यटन खात्याच्या अधिका-यांना सांगण्यात आले आहे अशी माहिती दिली. तर प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या सदस्य सचिव शर्मिला मोन्तेरो यांनी मंडळाच्या अधिका-यांकडून या उल्लंघनाची पहाणी केली असून त्यांचा अहवाल आल्यानंतर पुढची कारवाई केली जाईल अशी माहिती दिली.

 

टॅग्स :goaगोवा