मडगाव : पार्क करून ठेवलेल्या वाहनांतील मौल्यवान वस्तू लंपास करणाऱ्या पाच जणांच्या एका गँगचा क्राईम ब्रँचने पर्दाफाश केला आहे. मडगाव येथे घडलेल्या अशाच प्रकाराच्या एका चोरी प्रकरणातही या टोळीचा सहभाग असल्याचे तपासात उघड झाले असून संशयितांनी या कृत्याची कबुलीही दिली आहे. वास्को भागातही त्यांनी चोऱ्या केलेल्या असून या गँगकडून पोलिसांनी ९ लाखांचे सुवर्णलंकारही जप्त केले आहे. क्राईम ब्रँचच्या घरफोडीविरोधी पथकाने बुधवारी ताहिर उस्मान सय्यद (१८), हजरतसाब खुदबुद्दीन शेख (१९), विजय कनप्पा हरिजन ऊर्फ इक्बाल (२५), हमीद शेख (२३) व श्रीनिवास तळेगर ऊर्फ छोटू (३३) या पाचजणांच्या मुसक्या आवळल्या. (पान २ वर)
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}