शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

रेकॉर्डब्रेक पाऊस!

By admin | Updated: June 21, 2015 02:31 IST

पणजी : राज्यात तीन दिवसांत सरासरी १० इंच पाऊस कोसळला असून मडगावमध्ये १८ इंच पावसाची नोंद झाली आहे.

पणजी : राज्यात तीन दिवसांत सरासरी १० इंच पाऊस कोसळला असून मडगावमध्ये १८ इंच पावसाची नोंद झाली आहे. या तीन दिवसांच्या पावसामुळे यंदा सामान्य प्रमाणापेक्षा २० टक्के पाऊस अधिक पडला आहे.हवामान खात्याच्या नोंदीनुसार, तीन दिवसांत राज्यभर सरासरी १० इंच पाऊस पडला. शनिवार, २० जून रोजी रात्री ८.३० वाजेपर्यंत २५ इंच पावसाची नोंद झाली होती. हवामान खात्याच्या हिशेबानुसार, या तारखेपर्यंत सामान्य पाऊस हा २० इंच इतका असतो. प्रत्यक्ष पाऊस हा २५ इंचांपेक्षा अधिक नोंद झाला आहे. म्हणजेच २० टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. हवामान खात्याने उद्याही पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.किंचित वायव्येच्या दिशेने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात केवळ किनारपट्टी भागातच पावसाने धडक दिली होती; परंतु आता मान्सूनची दिशाही नैर्ऋत्य-ईशान्य अशी सुरळीत झाल्यामुळे राज्यातील अंतर्गत भागातही पाऊस पडू लागला आहे. २४ तासांत सांगेत ६ इंच, केपेत ४.५ इंच, फोंड्यात ४.७, तर साखळीत ५.५ इंच पाऊस पडला....तर पावसाचे दीड शतकपावसाचा धडाका असाच कायम राहिला, तर यंदा १४० इंचांपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या १० वर्षांच्या पावसाच्या आकडेवारीनुसार, गोव्यातील सरासरी पाऊस हवामान खात्याने १२७ इंच एवढा ठरविला आहे. २०१४ मध्ये तो १३० इंच एवढा नोंदवला गेला. या वर्षी पावसाचा सध्याचा जोर कायम राहिल्यास सप्टेंबरअखेरीस १४० ते १५० इंच पावसाची नोंद होणे शक्य आहे.(प्रतिनिधी)