शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातून होणारी बेकायदा खडी वाहतूक रोखली

By admin | Updated: February 23, 2015 01:35 IST

रावण सत्तरी : महाराष्ट्रातून गोव्यात होणारी बेकायदा खडी वाहतूक रविवारी सकाळी रावण, सत्तरी येथे रोखण्यात आली.

रावण सत्तरी : महाराष्ट्रातून गोव्यात होणारी बेकायदा खडी वाहतूक रविवारी सकाळी रावण, सत्तरी येथे रोखण्यात आली. तसेच खडी भरून आलेले ट्रक तिथेच खाली करून सोडण्यात आले. ही वाहतूक बंद न झाल्यास आलेला प्रत्येक ट्रक खाली करून सोडण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे. मागील तीन वर्षांपासून ही बेकायदा वाहतूक सुरू असून तळेखोल, दोडामार्ग (महाराष्ट्र) येथे असलेल्या खडी क्रशरवरून ही खडी बेकायदा रावण, पर्येमार्गे गोव्यातील विविध भागांत हलवण्यात येते. महाराष्ट्रातून गोव्यात खडी आणताना कोणताही कर सरकारला देण्यात येत नाही. तसेच महाराष्ट्रातून गोव्याला जोडणाऱ्या रावण, पर्ये या रस्त्यादरम्यान कुठेही चेकनाका नसल्याने गेल्या तीन वर्षांत हजारो ट्रक खडी या मार्गाने बेकायदा हलवण्यात आली आहे. यामुळे सरकारचा लाखो रुपयांचा महसूल बुडला आहे. तसेच या वाहतुकीमुळे रावण-पर्ये या रस्त्याची पूर्णपणे वाताहत झाली असून सध्या रावण ते पर्ये दरम्यानच्या रहिवाशांना या वाहतुकीचा मनस्ताप सहन करावा लागतो. आधीच अरुंद असलेल्या रस्त्यावरून होणाऱ्या खडीने भरलेल्या ट्रकची भरधाव वाहतूक जीवावर बेतणारी असून या वाहतुकीमुळे ठिकठिकाणी रस्ता खचला आहे. तसेच धूळ प्रदूषण यामुळे नागरिक हैराण आहेत. या बेकायदा वाहतुकीविषयी गेल्या वर्षी डिचोली उपजिल्हाधिकारी, वाळपई मामलेदार, पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग यांना निवेदन सादर करून याकडे लक्ष वेधले होते; परंतु पोलिसांनी विशेष कारवाई न केल्याने ही वाहतूक सुरूच होती. दरम्यान, रविवारी सकाळी नागरिकांनी एकत्र येऊन रावण येथील देवळाजवळ महाराष्ट्रातून खडी भरून आलेले ट्रक अडवले व ट्रकचालकांकडे ट्रक व खडी क्रशरमालकाला पाचारण करावे, असा आग्रह धरला. मात्र, ट्रकमालक तसेच खडी क्रशरचालकाने या ठिकाणी येण्यास नकार दिल्याने खवळलेल्या नागरिकांनी खडी भरून आलेले ट्रक तिथेच खाली करून परत पाठवले. तसेच या पुढे एक जरी ट्रक या रस्त्याने आल्यास तो पुढे सोडला जाणार नाही, असा इशारा नागरिकांनी दिला आहे. (खास प्रतिनिधी)