शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
2
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
3
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
4
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
5
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
6
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
7
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
8
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
9
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
10
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
11
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
12
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
13
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
14
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
15
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
16
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
17
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
18
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
19
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
20
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल चोरीतील मास्टरमाईंड स्वेतन दोन महिन्यांनंतर शरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2019 17:51 IST

उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळला

मडगाव: इस्टर्न बायपास रस्त्यावर उघडकीस आलेल्या पेट्रोल चोरी प्रकरणातील मागचे दोन महिने अटक चुकवत असलेला मुख्य आरोपी स्वेतन सिमेपुरुषकर हा शेवटी बुधवारी फातोर्डा पोलिसांना शरण आला. त्याने अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज मंगळवारी उच्च न्यायालयाने फेटाळला होता. मुख्य आरोपी सिमेपुरुषकर याला अटक केल्यानंतर आता या रॅकेटमधील अन्य आरोपींपर्यंत पोहोचण्यास पोलिसांना मदत होणार आहे.भारत पेट्रोलियमच्या टँकरमधून इंधनाची चोरी करताना पोलिसांनी २८ ऑगस्टला दवर्ली भागात पाच जणांना अटक केली होती. सांगेचे माजी आमदार सुभाष फळदेसाई यांच्या मालकीच्या शिरवई येथे असलेल्या पेट्रोल पंपवर इंधनाचा पुरवठा करण्यासाठी हा टँकर वास्कोहून रवाना झाला होता. त्यावेळी मधल्या वाटेत ही चोरी करताना आरोपींना पकडण्यात आले होते. त्यावेळी या रॅकेटचा मास्टरमार्इंड स्वेतन असल्याचे उघडकीस आले होते. स्वेतनने टँकरच्या टाकीची बनावट चावी करुन घेतली होती. याच चावीने टाकी उघडून ही चोरी केली जात होती.यापूर्वी या प्रकरणात फातोर्डा पोलिसांनी दस्तगीर पठाण, कृपाशंकर पटेल, राजेश शिरोडकर, अकबर दोडामणी व चंद्रकांत प्रभु या पाच जणांना अटक केली होती. नंतर त्यांना जामिनावर मुक्त करण्यात आले होते. या प्रकरणातील पाच संशयितांना जामिन मुक्त केल्यामुळे आपल्यालाही जामीन मिळावा यासाठी स्वेतन याने उच्च न्यायालयात अर्ज केला होता. मात्र ज्या अर्थी स्वेतनकडे टँकरच्या टाकीची डुप्लीकेट चावी आहे, त्या अर्थी या कारस्थानात तेल कंपनीचेही कर्मचारी सामील असू शकतात असा दावा सरकारी वकील एस. आर. रिवणकर यांनी करुन या कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी स्वेतनला अटक करुन चौकशी करण्याची गरज आहे असा दावा न्यायालयात केला होता. हा दावा ग्राह्य धरुन न्या. पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी स्वेतनचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळून लावला होता.फातोर्डा पोलीस स्थानकाचे निरीक्षक कपील नायक यांच्याशी संपर्क साधला असता, संशयित स्वेतन शरण आल्याचे त्यांनी कबूल केले. आज गुरुवारी संशयिताला न्यायालयासमोर पेश करुन त्याच्या पोलीस कोठडीचा रिमांड घेतला जाणार आहे.           

टॅग्स :Petrolपेट्रोल