शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात लवकरच सेंद्रिय कृषी विद्यापीठाची स्थापना- बाबू कवळेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2020 19:28 IST

गोवा सेंद्रिय शेतीचे हब बनविण्याचा संकल्प सोडलेल्या गोवा सरकारकडून राज्यात सेंद्रीय कृषी विद्यापीठ सुरू करण्याचे ठरविले आहे.

मडगाव: गोवा सेंद्रिय शेतीचे हब बनविण्याचा संकल्प सोडलेल्या गोवा सरकारकडून राज्यात सेंद्रीय कृषी विद्यापीठ सुरू करण्याचे ठरविले आहे. सोमवारपासून सुरू होणा-या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्यावेळी मुख्यमंत्र्यांकडून या संबंधी घोषणा होणार आहे. कृषिमंत्री बाबू कवळेकर यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. ते म्हणाले, गोव्यात सेंद्रिय शेतीला उत्तेजन देण्याचा सरकारचा मानस आहे. त्याचाच एक भाग म्हणून हे विद्यापीठ गोव्यात सुरू करण्याचे ठरविले आहे. या विद्यापीठात सेंद्रिय शेतीच्या अभ्यासाबरोबरच नवीन संशोधनाला चालना देण्यात येणार आहे. याशिवाय गोव्यातील सेंद्रिय उत्पादनाचे या विद्यापीठाकडून प्रमाणपत्रे दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.नुवे व वेर्णा या भागातील शेतक-यांनी घेतलेल्या कलिंगडाच्या पिकाला कीड लागल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहाणी करण्यासाठी कवळेकर शुक्रवारी या भागात आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी नवीन विद्यापीठाचे सूतोवाच केले. यासाठी केंद्र सरकारकडूनही भरीव मदत  दिली जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.ज्या भागात किडीचा प्रादुर्भाव होऊन कलिंगडांच्या पिकांची नासाडी झाली, त्याचा संपूर्ण आढावा घेण्याचे आदेश आपण कृषी संचालकांना दिले आहेत. गोव्यात पहिल्यांदाच असा प्रकार घडत आहे. शेतक-यांकडून औषध फवारणी होऊनही पिकाला कीड लागली. त्यामुळे ही कीड कशी लागली यासंबंधीही संशोधन केले जाणार असल्याचे ते म्हणाले. या शेतक-यांना योग्य ती नुकसानभरपाई दिली जाईल, असेही कवळेकर यांनी सांगितले. यावेळी त्यांच्याबरोबर नुवेचे आमदार विल्फ्रेड (बाबाशान) डिसा हे उपस्थित होते.