शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

"कॅसिनोंवर फक्त पर्यटकांनाच प्रवेश, मात्र तपासणीचा अधिकार अजून कुणाकडेच नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2020 19:35 IST

गोवा सार्वजनिक जुगार प्रतिबंधक कायद्याला 2012 साली करण्यात आलेल्या दुरुस्तीनुसार सरकारच्या गृह खात्याने शुक्रवारी अधिसूचना जारी केली.

पणजी : गोवा सार्वजनिक जुगार प्रतिबंधक कायद्याला 2012 साली करण्यात आलेल्या दुरुस्तीनुसार सरकारच्या गृह खात्याने शुक्रवारी अधिसूचना जारी केली. या अधिसूचनेनुसार आज 1 पासून फक्त पर्यटकांनाच कॅसिनोंमध्ये प्रवेश असेल. मात्र कॅसिनोत गोमंतकीय प्रवेश करतात की नाही हे पाहण्यासाठी गेमिंग कमिशनर म्हणून अजून कुठल्याही अधिका-याची सरकारने नियुक्ती केलेली नाही.मांडवी नदीत एकूण पाच तरंगते कॅसिनो आहेत. त्याशिवाय पंचतारांकित हॉटेलांतही कॅसिनो चालतात. कॅसिनोंमध्ये जाण्यास गोमंतकीयांना बंदी असावी, अशी मागणी 2010 सालापासून सुरू आहे. 2012 साली गोवा सरकारने जुगार प्रतिबंधक कायदा दुरुस्त केला. पण त्या दुरुस्तीनुसार अधिसूचना जारी झाली नव्हती. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अधिसूचना जारी केली जाईल, असे दोन दिवसांपूर्वीच जाहीर केले होते. त्यानुसार शुक्रवारी अधिसूचना जारी झाली.  गोवा सार्वजनिक जुगार प्रतिबंधक कायद्यातील कलम तीन, चार व पाचमधील तरतुदी 1 फेब्रुवारीपासून लागू झाल्या.मात्र प्रत्यक्षात कॅसिनोंमध्ये खेळण्यासाठी कोण जातात ते तपासण्यासाठी अजून सरकारने कोणतीच यंत्रणा नियुक्त केलेली नाही. वाणिज्य कर खात्याच्या आयुक्तांनाच गेमिंग कमिशनर म्हणून नियुक्त केले जाईल, असे मुख्यमंत्री सावंत यांनी जाहीर केले होते. तथापि, अजून आयुक्तांना गेमिंग कमिशनर म्हणून अधिकार दिले गेलेले नाहीत. गृह खात्याने जारी केलेल्या अधिसूचनेतही तसा उल्लेख नाही. वाणिज्य कर आयुक्त दिपक बांदेकर यांना या प्रतिनिधीने विचारले असता, कॅसिनोंमध्ये जाऊन लोकांची ओळखपत्रे तपासण्याविषयी आपल्याला अजून कोणतेच अधिकार नाहीत असे त्यांनी सांगितले. आपण अजून गेमिंग कमिशनर झालेलो नाही, असेही बांदेकर म्हणाले.कायद्यात काय म्हटले आहे?2012 सालच्या गोवा सार्वजनिक जुगार प्रतिबंधक दुरुस्ती कायद्यातील कलम 13 बीमध्ये म्हटलेय की- कॅसिनोत जिथे गेम चालते तिथे पर्यटक वगळता अन्य कोणत्याच व्यक्तीला जाता येणार नाही. मात्र कॅसिनोंमध्ये जे कर्मचारी काम करतात, त्यांना कामासाठी जाता येईल. पर्यटक परमिट नसताना जर कुणी सापडला तर त्यास दंड भरावा लागेल. कलम 13 डीमध्ये गेमिंग कमिशनरचे अधिकार स्पष्ट करण्यात आले आहेत. कॅसिनोंमधील गेमवर गेमिंग कमिशनरने नियंत्रणो ठेवावे. त्याबाबतचे रजिस्टर, रेकॉर्ड वगैरे ठेवणो अपेक्षित आहे. पंचतारांकित हॉटेलांमध्येही गेमिंगच्या ठिकाणी जाणा:या पर्यटकाला परमिट प्राप्त करावे लागेल. मात्र सरकारच्या ताज्या अधिसूचनेत त्याबाबत स्पष्टता नाही. सरकारने गेमिंग कमिशनर कोण ते स्पष्ट केले नाही. गेमिंग कमिशनरला मनुष्यबळ पुरवावे लागेल.........