शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

खाण कंपन्यांना पुन्हा दणका!

By admin | Updated: October 15, 2014 01:33 IST

पणजी : राज्यातील सर्व खनिज माल सरकारचा असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी नमूद करून बांदेकर खाण कंपनीचा हस्तक्षेप अर्ज फेटाळून लावला आहे.

पणजी : राज्यातील सर्व खनिज माल सरकारचा असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी नमूद करून बांदेकर खाण कंपनीचा हस्तक्षेप अर्ज फेटाळून लावला आहे. यामुळे बांदेकर खाण कंपनीसह राज्यातील अन्य सर्वच खाण व्यावसायिकांना अप्रत्यक्षरीत्या दणका बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या वनविषयक खंडपीठासमोर मंगळवारी या अर्जावर सुनावणी झाली. आपल्या खाणीवर असलेला खनिज माल आपण २००७ पूर्वी काढला होता, असा दावा बांदेकर कंपनीने केला होता. हा माल आपला आहे. सरकारने त्याचा ई-लिलाव पुकारला, तर त्याच्या विक्रीतून येणारी किंमत ही आपल्याला मिळायला हवी, असे कंपनीचे म्हणणे होते. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या २१ एप्रिल रोजी निवाडा देताना राज्यातील २००७ नंतरचा सगळा खाण व्यवसाय बेकायदा ठरवून २००७ पासून लिजेस रद्द झाल्याचे स्पष्ट केले आहे. आपल्या त्याच आदेशावर एकप्रकारे न्यायालयाने मंगळवारी शिक्कामोर्तब केले. आपण २००७ सालापूर्वी खनिज माल काढला असल्याचे तसेच हा माल आपला असल्याचे बांदेकर कंपनीचे म्हणणे न्यायालयाने मान्य केले नाही. बांदेकर कंपनीच्या या दाव्यास राज्याचे अ‍ॅडव्होकेट जनरल आत्माराम नाडकर्णी यांनी आक्षेप घेतला. नाडकर्णी व इतरांचे युक्तिवाद न्यायालयाने ऐकून घेतले व बांदेकर कंपनीचा हस्तक्षेप अर्ज फेटाळून लावला. या कंपनीचा हा दावा मान्य झाला असता, तर अन्य खाण कंपन्याही पुढे आल्या असत्या व आपणही २००७ सालापूर्वी माल काढला असून तो आपल्या मालकीचा आहे, असे त्या कंपन्यांनी सांगितले असते. इनव्हेन्टरी झालेला एकूण १५.२ दशलक्षटन खनिज माल असून हा सगळा माल शासकीय मालकीचा आहे. सगळ्याच खनिज मालाचा ई-लिलाव होऊन सगळी रक्कम सरकारला मिळणार आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या मंगळवारच्या निवाड्याचा सेसा स्टरलाईट कंपनीशी कोणताही संबंध नाही, असे या कंपनीने स्पष्ट केले आहे. न्यायालयीन निवाड्यामुळे सेसा स्टरलाईटचे शेअर्स उतरल्याचे सूत्रांनी सांगितले. (खास प्रतिनिधी)