शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या १०० रुपयांत वैद्यकीय तपासण्या; 'मल्टि-इन्व्हेस्टिगेशन हेल्थ स्ट्रीप'ची मुख्यमंत्र्यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 07:56 IST

या कार्यक्रमात ख्यातनाम वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकर यांना यंदाचा 'गोमंत गौरव सन्मान' हा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: आरोग्य संचालनालय आणि अंजनी माशेलकर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात लवकरच केवळ १०० रुपयांत आणि अवघ्या १० मिनिटांत विविध वैद्यकीय तपासण्या करणारी 'मल्टि-इन्व्हेस्टिगेशन हेल्थ स्ट्रीप' सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गुरुवारी केली. गोवा चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे आणि वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या सहकार्याने कला अकादमीत 'गोमंत गौरव सन्मान' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमात ख्यातनाम वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकर यांना यंदाचा 'गोमंत गौरव सन्मान' हा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. उद्योगमंत्री माविन गुदिन्हो, गोवा चेंबर ऑफ कॉमर्सच्या अध्यक्ष प्रतिमा धोंड, वर्ल्ड पीस युनिव्हसिर्टीचे कार्यकारी संचालक मान्यवर राहुल कराड यांसह व्यासपीठावर उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, 'डॉ. रुघुनाथ माशेलकर यांनी विकसित केलेल्या या संशोधनाचा राज्यातील आरोग्य सेवांना अधिक परवडणाऱ्या दरात व जलद स्वरूपात सेवा उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वपूर्ण मदत होणार आहे. सध्या सुरू असलेल्या आरोग्य संशोधन उपक्रमांतर्गत ही सुविधा तयार करण्यात आली असून, येत्या काही दिवसांत ती राज्यभर पूर्णतः कार्यान्वित केली जाणार आहे.

मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, नव्या तंत्रज्ञानामुळे नागरिकांना जलद, अचूक आणि स्वस्त दरात वैद्यकीय तपासण्या उपलब्ध होतील. विशेषत ग्रामीण व दुर्गम भागातील लोकांसाठी ही सुविधा मोठा दिलासा ठरणार आहे. या हेल्थ स्ट्रीपद्वारे विविध प्राथमिक तपासण्या एकाच वेळी करता येणार असून, रुग्णांना अहवालासाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागणार नाही.'

मुख्यमंत्री म्हणाले, पद्मविभूषण डॉ. माशेलकर यांचा माझ्या हस्ते सत्कार होत आहे याचा मला अभिमान वाटतो. त्यांचे विचार ऐकताना मला नेहमीच प्रेरणा मिळते. त्यांच्या भाषणांमध्ये असलेली ऊर्जा, सकारात्मकता आणि दूरदृष्टी यामुळे अनेक वेळा त्यांची भाषणे आवर्जून ऐकली आहेत. त्यांचे विचार केवळ वैज्ञानिक क्षेत्रापुरते मर्यादित नाही.

डॉ. माशेलकर म्हणाले, 'माझ्या नावावर असलेल्या ५४ मानद डॉक्टरेट पदव्या या केवळ माझ्या यशाचे प्रतीक नसून, आईच्या दूरदृष्टीचे आणि शिक्षणावरील विश्वासाचे प्रतिबिंब आहेत. त्यामुळे माझ्या आईच्या नावाने सुरू केलेल्या अंजनी फाऊंडेशनतर्फे आम्ही विज्ञानाचा वापर गरिबांसाठी करत राहणार आहे. आणि माझ्या जन्मभूमीत, गोव्यात ही सेवा लवकर सुरू व्हावी, अशीच माझी इच्छा आहे.'

आईच्या त्यागामुळेच यशाचा प्रवास : माशेलकर

आपल्या सन्मानानंतर भाष्य करताना डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी भावुक होत आपल्या यशामागील प्रेरणादायी प्रवास उलगडला. त्यांनी आईच्या त्यागाचे व जिद्दीचे विशेष स्मरण केले. माशेलकर म्हणाले, 'अत्यंत गरिबीत माझे बालपण गेले. माझ्या अशिक्षित आईने आयुष्यातील कठीण प्रसंगांचा सामना करताना एक ठाम निर्धार केला की मी उच्च शिक्षण घेणारच. एका नोकरीसाठी नकार मिळाल्यानंतर तिने शिक्षणालाच सर्वात मोठे साधन मानले आणि मला सतत पुढे जाण्यास प्रेरित केले. पीएचडी करण्यापासून ते पोस्टडॉक्टरल शिक्षणापर्यंत प्रत्येक टप्प्यावर आईने दिलेली प्रेरणा आणि पाठबळ अत्यंत महत्त्वाचे ठरले. तिच्या विश्वासामुळेच मी आव्हानांवर मात करून यशोशिखर गाठले.

थिवी येथे वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी

'पुढील शैक्षणिक वर्षापासून थिवी येथे वर्ल्ड पीस युनिव्हसिर्टीतर्फे अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत. त्याचा लाभ राज्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना होणार आहे. जे लोक खासगी विद्यापीठांना विरोध करत आहे, त्यांनी या विद्यापीठाचे काम पहावे. त्यांनी शिक्षणावर खूप भर दिला आहे' असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : ₹100 Medical Tests: CM Announces 'Multi-Investigation Health Strip'

Web Summary : Goa to launch 'Multi-Investigation Health Strip' for ₹100, enabling quick medical tests. CM Pramod Sawant announced the initiative, benefiting rural areas with affordable healthcare, thanks to Dr. Mashelkar's research and the Anjani Foundation.
टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत