शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

१३ खाणींना कोणत्याही क्षणी लिज

By admin | Updated: November 5, 2014 02:20 IST

पणजी : खाण लिज धोरणाचा अंतिम मसुदा मंत्र्यांमध्ये फिरवून मंगळवारी या धोरणाला मंजुरी घेण्यात आली.

पणजी : खाण लिज धोरणाचा अंतिम मसुदा मंत्र्यांमध्ये फिरवून मंगळवारी या धोरणाला मंजुरी घेण्यात आली. यामुळे १३ खाणींना लिज बहाल करण्याचा आदेश बुधवारी अपेक्षित आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी लिजांच्या आदेशाचा मार्ग आता मोकळा झाला असल्याचे स्पष्ट करून बुधवारी लिजांचा आदेश काढला जाऊ शकतो, असे सांगितले. स्टॅम्प ड्युटी भरलेल्या २८ पैकी २0 खाणींना लिज बहाल केले जाऊ शकते, असे संकेत पर्रीकर यांनी दिलेले आहेत. त्यामुळे आणखी ७ खाणींना लिज बहाल करण्याचा आदेश लवकरच अपेक्षित आहे. स्टॅम्प ड्युटी भरलेल्या २८ कंपन्यांपैकी सात ते आठ कंपन्यांकडून नियम भंग झालेला असू शकतो, असे सरकारचे म्हणणे आहे. लिजांचे एकूण तीन प्रकारे वर्गीकरण करण्यात आले आहे. ज्या खाणींवर मोठ्या प्रमाणात नियमभंग करण्यात आल्याचा आरोप आहे, त्यांचा समावेश एका वर्गात करण्यात आला आहे. तसेच ज्यांनी किरकोळ स्वरूपाचे उल्लंघन केले आहे त्यांचा समावेश दुसऱ्या वर्गात केला गेला आहे. ज्यांच्याविषयी प्रश्न नाहीत अशा लिजांचा समावेश पहिल्या वर्गात आहे. १९५७ च्या एमएमडीआर कायद्याच्या कलम ८(३) नुसार लिजांचे नूतनीकरण केले जाईल. तसेच नवी लिज दिली जातील. सर्वोच्च न्यायालयाने १९६० सालच्या ३७ व ३८ मिनरल कन्सेशन नियमांच्या भंगाबाबत खाण कंपन्यांविरुद्ध कारवाई करण्यास सांगितले आहे. त्यानुसार नोटिसा पाठवून योग्य ती कारवाई केली जाईल. दंड ठोठावणे, रॉयल्टी वसूल करणे, प्रसंगी लिजही रद्द करणे अशा प्रकारची ही कारवाई असेल. बुधवारी मुख्यमंत्री दिल्लीला जाणार असल्याने मंत्रिमंडळ बैठकही होणार नाही. यामुळे मंगळवारीच मसुदा मंत्र्यांमध्ये फिरवून मंजुरी घेण्यात आली. (प्रतिनिधी)