अल्पवयीन मुलीचे अपहरण, पित्याची तक्रार

By Admin | Updated: May 31, 2014 01:36 IST2014-05-31T01:27:57+5:302014-05-31T01:36:23+5:30

सावर्डे : एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी कुडचडे पोलीस स्थानकात नोंदविली आहे.

Kidnapping of minor girl, complaint of father | अल्पवयीन मुलीचे अपहरण, पित्याची तक्रार

अल्पवयीन मुलीचे अपहरण, पित्याची तक्रार

 सावर्डे : एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी कुडचडे पोलीस स्थानकात नोंदविली आहे. कुडचडे पोलिसांनी भादंसंच्या ३६३ कलमाखाली व बाल गुन्हा ८ कलमाखाली तक्रार नोंद केली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इयत्ता दहावीत शिकणारी अल्पवयीन मुलगी २६ मे रोजी रात्री १0.३0 वाजल्यापासून घरातून निघून गेली. जाताना तिने एक पत्र लिहून ठेवले असून, त्यात आपण स्वखुषीने घरातून जात असून, आपल्या मागे कोणालाही दोषी मानू नये, असा उल्लेख आहे. या प्रकरणाची तिच्या वडिलांनी २७ मे रोजी कुडचडे पोलिसांत आपली मुलगी बेपत्ता झाल्याची रितसर तक्रार नोंदवली होती. त्यानतंर तिचा शोध घेऊनही ती मिळाली नाही. या प्रकरणाचा पोलीस उपनिरीक्षक अशोक देसाई हे निरीक्षक मनोज म्हार्दोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करीत आहेत. (लो.प्र.)

Web Title: Kidnapping of minor girl, complaint of father