शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
3
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
4
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
5
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
6
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
7
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
8
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
9
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
10
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
11
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
12
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
13
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
14
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
15
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
16
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
17
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
18
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
19
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
20
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

कवळे शांतादुर्गा देवस्थानचा कोट्यवधींचा ऐवज गायब

By admin | Updated: July 3, 2014 01:18 IST

फोंडा : कवळे येथील प्रसिध्द श्री शांतादुर्गा देवस्थानच्या विद्यमान कार्यकारिणी समितीने देवस्थानच्या मालमत्तेतून कोट्यवधी रुपयांचा ऐवज गायब झाल्याची तक्रार फोंडा पोलिसांत दिली आहे.

फोंडा : कवळे येथील प्रसिध्द श्री शांतादुर्गा देवस्थानच्या विद्यमान कार्यकारिणी समितीने देवस्थानच्या मालमत्तेतून कोट्यवधी रुपयांचा ऐवज गायब झाल्याची तक्रार फोंडा पोलिसांत दिली आहे. याबाबत फोंड्याचे पोलीस निरीक्षक सी. एल. पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या प्रकरणी गेल्या एप्रिल महिन्यात देवस्थान समितीने निवेदन दिल्याचे व या प्रकरणाची चौकशी फोंड्याचे मामलेदार अमोल गावकर करीत असल्याचे सांगितले. तसेच पोलिसांना एकूण किती ऐवज चोरीला गेला आहे, याचा तपशील उपलब्ध झालेला नसून मामलेदार गावकर यांच्या चौकशी अहवालानंतरच सत्य समोर येणार असल्याचे ते म्हणाले. पोलीस सूत्रांनुसार हे तक्रारवजा निवेदन गेल्या एप्रिल महिन्यात देण्यात आले होते. विद्यमान कार्यकारिणीने १ एप्रिल रोजी मावळत्या समितीकडून ताबा तसेच चाव्या स्वीकारल्या होत्या. त्यानंतर नूतन समितीला हा ऐवज गायब असल्याचे आढळून आले. मात्र, मावळत्या समितीकडे चौकशी केली असता २0१२ सालच्या समितीकडून ताबा स्वीकारताना जो ऐवज होता, त्याच परिस्थितीत तो नवीन समितीकडे दिला गेल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. पोलीस सूत्रांनी विद्यमान कार्यकारिणीने ऐवज पडताळून न पाहता ताबा कसा काय स्वीकारला याबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे. फोंड्याचे मामलेदार अमोल गावकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सध्या देवस्थानच्या मालमत्तेतील किमती ऐवज गायब झाल्याबाबत एफआयआर नोंद करण्यात आला असून या प्रकरणी चौकशी सुरू असल्याचे सांगितले. विद्यमान कार्यकारिणी समितीने अमूकच व्यक्ती किंवा समितीवर ठपका ठेवलेला नाही. मात्र, ऐवज गायब झाल्याची तक्रार आल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)