घर वास्तुशास्त्रानुसारच हवे

By Admin | Updated: May 27, 2014 01:36 IST2014-05-27T01:34:09+5:302014-05-27T01:36:21+5:30

पणजी : वास्तुशास्त्र ही काळाची गरज बनली आहे़ सुंदर घराचे स्वप्न बघणार्‍यांनी आपल्या वास्तूची रचना करताना वास्तुशास्त्राचे नियम लक्षात घेऊन त्यानुसार त्याची उभारणी करावी,

Home architecture required | घर वास्तुशास्त्रानुसारच हवे

घर वास्तुशास्त्रानुसारच हवे

पणजी : वास्तुशास्त्र ही काळाची गरज बनली आहे़ सुंदर घराचे स्वप्न बघणार्‍यांनी आपल्या वास्तूची रचना करताना वास्तुशास्त्राचे नियम लक्षात घेऊन त्यानुसार त्याची उभारणी करावी, असे प्रतिपादन वास्तुरविराज ग्रुपचे अध्यक्ष डॉ. रविराज अहिरराव यांनी व्यक्त केले. ‘लोकमत’ आणि ‘वास्तुरविराज’ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी ‘रोल आॅफ वास्तुशास्त्र इन कस्ट्रक्शन प्रोजेक्ट्स अ‍ॅण्ड क्रायसिस मॅनेजमेंट’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. या वेळी ‘लोकमत’चे संस्थापक स्वर्गीय जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली़ कार्यक्रमास सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रिन्सिपल चिफ इंजिनियर जे.एस.एस. रेगो, के्रडाई गोवाचे अध्यक्ष देश प्रभुदेसाई, ‘लोकमत मीडिया’चे गोवा शाखेचे सरव्यवस्थापक संदीप गुप्ते उपस्थित होते. ‘लोकमत’ जाहिरात विभागाचे साहाय्यक व्यवस्थापक कल्पेश काटकर यांनी चित्रफितीच्या माध्यमातून ‘लोकमत’च्या आजपर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेतला. वास्तुशास्त्र या कलेला अंधश्रध्दा न मानता वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहावे व या शास्त्राचा अवलंब बांधकामात करावा, असे मत क्रेडाई गोवाचे अध्यक्ष देश प्रभुदेसाई यांनी व्यक्त केले. या वेळी अहिरराव म्हणाले की, योग्य रचना, पंचतत्त्वांचे योग्य संतुलन ठेऊन तयार केलेली वास्तू ही नेहमीच लाभदायक व सुखकारक ठरत असते. भारतात या वास्तुशास्त्र कलेची बिजे हजारो वर्षांपूर्वी रोवली गेली; परंतु पाश्चिमात्य संस्कृतीच्या प्रभावामुळे हे शास्त्र विस्मृतीच्या पडद्याआड गेले़ पाश्चात्यांनी या शास्त्राचा अवलंब केला़, तेव्हापासून देशात पुन्हा या शास्त्राला मान्यता मिळू लागली आहे. शिक्षण स्ांस्था, मॉल, तसेच इतर व्यावसायिक वास्तूंची रचना वास्तुशास्त्राच्या साहाय्याने कशी हितकारक, सुखकारक असू शकते या विषयी मार्गदर्शन केले. सध्या हे शास्त्र फक्त हिंदू धर्मापुरतेच मर्यादित राहिले नसून, इतर धर्मांतील लोकही वास्तू, जागा खरेदी करताना या विषयी विचार करतात. सध्या बांधकाम क्षेत्रात अनेक प्रयोग केले जात आहेत़ मात्र, या प्रयोगांना वास्तुशास्त्राची जोड देण्याची गरज आहे़ जागा खरेदी करणे त्यासंबंधीचा व्यवहार, वास्तुरचना व आराखडा, वास्तुतील सकारात्मक लहरी या विषयी मार्गदशन करण्याचे व भारताच्या प्राचीन शास्त्राचा शास्त्रशुध्द प्रचार देशाप्रमाणे विदेशातही करण्याचे कार्य वास्तुरविराज करत आहे. सिव्हिल इंजिनियरिंग, आर्किटेक्चर या अभ्यासक्रमातही वास्तुशास्त्राचा समावेश करावा यासाठी व या शास्त्राचे प्रशिक्षण देण्याचे कार्यही वास्तुरविराज करत असल्याचे अहिरराव यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Home architecture required