शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
2
मुलींचे लैंगिक शोषण; नराधमांना सोडणार नाही; बीड कोचिंग क्लास प्रकरणात एसआयटी
3
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
4
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती
5
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
6
‘खरे सुख श्रमाच्या पोटीच जन्म घेते; विसरू नका!’
7
शालार्थ आयडी, ३ महिन्यांत होणार एसआयटी चौकशी, शिक्षणमंत्री दादा भुसेंची माहिती
8
कोण खरे बोलते आहे? आणि कोणाचे दावे झूठ आहेत?
9
विधिमंडळाची ही आचारसंहिता; पण आमदार तसे वागतात का?
10
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
11
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या
12
वसई-विरारमध्ये १६ ठिकाणी ईडीची धाड; अनधिकृत इमारती प्रकरणी आर्किटेक्ट, अभियंते रडारवर
13
मराठी सक्तीचीच, पण हिंदीचाही अभिमान, मराठी माणसाला मुंबईतून कोणी घालविले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
14
डेटिंगवरून वाद विकोपाला, मुलीने जीव गमावला; सीसीटीव्ही, साक्षीदारांमुळे तपासाला दिशा
15
टायर-ट्यूबमधून जीवघेणा प्रवास, जव्हार तालुक्यातील प्रकार : पूल तर नाहीच, पण होडीसुद्धा उपलब्ध नाही
16
जहाजाच्या पुढील प्रवासाला ना हरकत देण्यासाठी लाचखोरी ; पोर्ट विभागाच्या ३ कॅप्टनसह दोघे सीबीआयच्या जाळ्यात
17
लेडीज डब्यामध्ये प्रवाशाकडे बाळ देऊन महिला पसार; सीवूड स्थानकातील घटना; पोलिसांकडून तपास सुरू
18
‘न्यू इंडिया’ सप्टेंबरपर्यंत सारस्वतमध्ये विलीन; ठेवीदारांच्या व्यापक हितासाठी निर्णय : ठाकूर
19
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
20
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?

गोव्यातील ऐतिहासिक ‘काम्र द सालसेत’ला हेरिटेजचा दर्जा, संवर्धन समितीकडून मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2018 17:34 IST

मडगावातीलच नव्हे तर संपूर्ण गोव्यातील वारसाप्रेमींना खुशखबर.  मडगावातील ‘काम्र द सालसेत’ या मडगावातील जुन्या मार्केटातील ऐतिहासिक महत्वाच्या जुन्या नगरपालिका इमारतीला हेरिटेज इमारतीचा दर्जा देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे या पडझडीला आलेल्या इमारतीच्या संवर्धनाचा मार्ग खुला झाला आहे.

- सुशांत कुंकळयेकर

 मडगाव :  मडगावातीलच नव्हे तर संपूर्ण गोव्यातील वारसाप्रेमींना खुशखबर.  मडगावातील ‘काम्र द सालसेत’ या मडगावातील जुन्या मार्केटातील ऐतिहासिक महत्वाच्या जुन्या नगरपालिका इमारतीला हेरिटेज इमारतीचा दर्जा देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे या पडझडीला आलेल्या इमारतीच्या संवर्धनाचा मार्ग खुला झाला आहे.गोवा सरकारच्या संवर्धन समितीने हा प्रस्ताव मान्य करतानाच या इमारत प्रकल्पाच्या जागेचे सौंदर्यीकरण करण्याबरोबरच या रस्त्यावरील हेरिटेज महत्व असलेल्या घरांची रंगरंगोटी करण्याचाही प्रस्ताव मान्य केला.संवर्धन समितीच्या बैठकीला उपस्थित असलेले नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी ही माहिती दिली. संवर्धन समितीच्या या निर्णयामुळे आता या ऐतिहासिक इमारत परिसरात तिच्या संवर्धनाव्यतिरिक्त अन्य कुठलाही बांधकाम प्रकल्प हाती घेता येणार नाही. या इमारतीला आता पुनर्वैभव मिळवून देणो शक्य होणार असल्याचे ते म्हणाले.या इमारतीला हेरिटेज स्थळ दर्जा देण्याबरोबरच जुन्या मार्केटात स्ट्रीटस्केप्स तयार करण्याचेही ठरले असून या निर्णयानुसार या परिसरातील जुन्या घरांच्या भिंतीवर देखणी चित्रे चित्रीत केली जाणार आहेत.सध्या या इमारतीची मालकी एका खासगी व्यक्तीकडे असून या इमारत मालकाने आपली जमीन सरकारला विकावी असा प्रस्ताव मंत्री सरदेसाई यांनी यापूर्वी ठेवला होता. सदर जागेचे संपादन करण्यासाठी मडगाव पालिकेने आपल्या अंदाजपत्रकात पाच कोटींची तरतूदही केली आहे.या इमारतीचे संवर्धन करण्यासाठी सदर जमीन संपादित करण्याचा ठराव 2010 मध्ये तत्कालीन नगराध्यक्ष सावियो कुतिन्हो यांच्या अध्यक्षतेखालील नगरमंडळाने घेतला होता. मात्र निधीच्या कमतरतेमुळे हा प्रस्ताव पूर्णत्वास येऊ कशला नव्हता. तीन वर्षापूर्वी इतिहासप्रेमी प्रजल साखरदांडे यांनी या इमारतीचे ऐतिहासिक महत्व विषद करताना या इमारतीच्या संवर्धनावर सरकारने गंभीरतेने विचार करावा अशी मागणी केली होती. 

टॅग्स :goaगोवा