शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! श्लोक कसा आहे विचारत बहिणीने सोडला प्राण; बुडणाऱ्या भावाला वाचवायला गेलेल्या सानिकाचाही मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 07:53 IST

या घटनेमुळे कुडचडेत दुःखाची छाया पसरली.

लोकमत न्यूज नेटवर्क, कुडचडे : खणगिणी-बेतुल येथे ओहोळात बुडणारा भाऊ, श्लोक नाईक (१०) याला वाचवताना जखमी झालेली बहीण सानिका नाईक (१७) हिचादेखील उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोघेही आपल्या कुटुंबीयांसह ओहोळावर आंघोळीसाठी गेले होते. वस्तवाडा-कुडचडे येथील नाईक कुटुंबीय सहलीसाठी खणगिणी येथे गेले होते. त्यावेळी ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे कुडचडेत दुःखाची छाया पसरली.

रविवारी, दि. १२ रोजी दक्षिण गोव्यात वीज पुरवठा खंडित असल्याने वस्तवाडा येथील श्लोक व सानिका हे आई, आजी, मावशीबरोबर खणगिणी येथे पिकनिकला गेले. ओहोळात आंघोळ करताना श्लोकचा पाय घसरून तो पाण्यात बुडाला. त्याला वाचवायला सानिकाने उडी मारली. यावेळी ती जखमी झाली. तेथील लोकांनी दोघांनाही बाहेर काढले.

ओहोळात बुडून लहानग्या श्लोक याचा रविवारी दुपारीच मृत्यू झाला. तर सानिका गोमेकॉमध्ये मृत्यूशी झुंज देत होती. रविवारच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी नाईक कुटुंब खणगिणी येथे गेले. ओहोळात त्यांनी आंघोळीचा आनंद घेतला. मात्र, नदीला आलेल्या भरतीमुळे ओहोळातील पाण्याचा प्रवाह वाढला. यावेळी श्लोक बुडू लागल्याचे लक्षात येताच सानिकाने भावासाठी जीवाची बाजी लावली. मात्र, तिचे प्रयत्न अपुरे पडले. श्लोकला पाण्याबाहेर काढले तेव्हा त्याचा मृत्यू झाला होता. तर सानिका बेशुद्ध होती. त्यामुळे तिला वाचविण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्न केले. मात्र, तिचाही मृत्यू झाला. अवघ्या २४ तासांत दोन मुलांचा मृत्यू झाल्याने नाईक कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

अखेरच्या क्षणीही होती भावाची काळजी

सानिका व श्लोक या दोन्ही भावंडांमध्ये अत्यंत जिव्हाळा होता. जेव्हा सानिका अंतिम घटका मोजत होती, तेव्हासुद्धा तिने श्लोक कसा आहे? त्याला काही झालं नाही ना अशी विचारणा करतच तिने आपला प्राण सोडला. सानिकाच्या आईने केलेल्या आक्रोशाने सर्वांचे मन हेलावून गेले. बाग-कुडचडे स्मशानभूमीत दोघांवरही अंत्यसंस्कार करण्यात आले.

मनमिळावू मुले हरपली

वस्तवाडा येथे सानिका, श्लोक त्यांचे वडील संजय, आई संजना, दीड वर्षाचा भाऊ समर्थ व आजी शुभांगी नाईक राहातात. वडील संजय नाईक हे कष्टकरी आहेत. काबाडकष्ट करून त्यांनी मुलांना शिकविले. मोठी मुलगी सानिका यंदा ११ वीची परीक्षा पास होऊन बारावीत गेली होती तर श्लोक पाचवी पास झाला होता. श्लोकला खेळाची व कला क्षेत्राची आवड होती. दोघेही मनमिळावू व हुशार होते. दोन्ही मुलांचा मृत्यू झाल्याने कुडचडेतील अनेकांना मोठा धक्का बसला.

दोघांना बाळ्ळीच्या आरोग्य केंद्रत नेले असता तेथे श्लोक मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सानिकाची प्रकृती गंभीर असल्याने तिला तातडीने बांबोळी येथे गोमेकॉत दाखल केले. मात्र, रविवारी रात्री उशीरा तिचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

English
हिंदी सारांश
Web Title : Sister Dies Saving Brother; Tragedy Strikes Naik Family in Goa

Web Summary : In a tragic incident in Goa, a sister died trying to save her drowning brother. Sanika Naik, 17, succumbed to injuries sustained while rescuing Shlok, 10, who also died. The family was picnicking when the accident occurred, plunging Kudchade into mourning.
टॅग्स :goaगोवाAccidentअपघात