शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

खाणी सरकारनेच चालवाव्यात : येचुरी

By admin | Updated: December 1, 2014 02:11 IST

पणजी : खाणी सरकारनेच ताब्यात घेऊन चालवाव्यात, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पॉलिट ब्युरो सदस्य तथा राज्यसभा खासदार सीताराम येचुरी यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत केली.

 पणजी : खाणी सरकारनेच ताब्यात घेऊन चालवाव्यात, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पॉलिट ब्युरो सदस्य तथा राज्यसभा खासदार सीताराम येचुरी यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत केली. खनिज संपत्तीचा अधिकाधिक स्थानिक वापर व्हावा, असेही ते म्हणाले. जागतिक शांतता परिषदेसाठी येचुरी येथे आले होते. भारताने इस्रायलकडून शस्त्रास्त्र खरेदी करू नये, असे आवाहन करून ते म्हणाले की, शस्त्रास्त्र व्यवहारातून मिळणारा पैसा इस्रायलकडून पॅलेस्टिनींवर अत्याचारांसाठी वापरला जातो. पॅलेस्टिनींवरील हल्ले थांबले पाहिजेत. नव्यानेच संरक्षणमंत्री बनलेले मनोहर पर्रीकर यांनी इस्रायलशी शस्त्रास्त्र व्यवहार थांबविण्याबाबत गंभीरपणे विचार करावा. या पक्षाचे अन्य एक पॉलिट ब्युरो सदस्य नीलोत्पल बसू यांनी इस्रायलशी लष्करी व्यवहार करणाऱ्या देशांना सर्व गोष्टी कळून चुकल्या आहेत, असा दावा केला. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी दिलेली आश्वासने पाळत नाहीत. मोदी सरकारची स्थिती संपुआसारखीच आहे. भाजपच्या राज्यात अच्छे दिन नाहीच, अशी टीका येचुरी यांनी केली. ‘वर्ल्ड पीस कौन्सिल आणि आॅल इंडिया पीस अ‍ॅण्ड सॉलिडॅरिटी आॅर्गनायझेशन’ या संस्थेतर्फे शातंता परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेत चार महत्त्वाचे ठराव करण्यात आले. केंद्रात भाजप सरकार त्यांना निवडणुकीत ज्या बड्या उद्योगांनी मदत केली त्यांना खुश करण्याच्या प्रयत्नात आहे. भाजपच्या प्रचार मोहिमेवर १५,000 कोटी खर्च करण्यात आले. इतके पैसे आणले कुठून, असा सवाल येचुरी यांनी केला. पुढील वर्षी प्रजासत्ताकदिनाला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना निमंत्रित करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयावर त्यांनी टीका केली. मोदी सरकार आर्थिक आघाड्यांवर अपयशी ठरले आहे, अशी टीका करताना भाजपकडून जातीयतेवर लोकांचे ध्रुवीकरण करण्याचे काम चालू आहे, असा आरोप येचुरी यांनी केला. लोकचळवळीतून याला विरोध झाला पाहिजे, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)